करमाळासोलापूर जिल्हा

आता पुन्हा प्रवासावर निर्बंध आल्याने e – pass गरजेचा ; अधिकृत लिंक जारी

करमाळा समाचार – वृत्तसंस्था

कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य शासनानं पुन्हा एकदा काही कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली. ज्याअंतर्गत राज्यात ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत असणारे निर्बंध आणखी कठोर करण्यात आले. यासोबतच प्रवासावरील निर्बंध अधिक कडक करण्यात आले. याच धर्तीवर राज्यात पुन्हा एकदा ई- पासची तरतूद करण्यात आली असून, त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे.

अत्यावश्यक कारणांसाठी आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी सर्वसामान्यांना या ई पासची आवश्यकता लागणार आहे. नागरिकांना काही महत्त्वच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई- पास काढावा लागणार आहे.

गुरुवारी रात्रीपासून राज्यात प्रवास, कार्यालयीन उपस्थिती, विवाहसोहळ्यांवर अनेक निर्बंध आले. 1 मे पर्यंतच हे नियम लागू असणार आहेत. त्यामुळं यादरम्यानच्या काळात काही महत्त्वाच्या कारणासाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यासच नागरिकांनी ई- पासचा वापर करावा असं आवाहन राज्यातील पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.

ई- पास मिळवण्यासाठी नेमकं काय करावं?

– ई- पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम, https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE