करमाळासोलापूर जिल्हा

नाल्याचे पाणी अडवल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी ; गावातील वि.का.से. सो. चेअरमनसह शेतकऱ्यांचे उपोषण

समाचार टीम

रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्याचा नैसर्गिक प्रवाह मध्येच काही शेतकऱ्यांनी अडवल्यामुळे पाच ते सहा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असतानाही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने विविध विकास सोसायटीच्या चेअरमन सह शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. उपोषणाला दोन दिवस उलटले तरी अद्याप प्रशासनाला जाग आली नसल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे.

मागील वर्षभरापासून घोटी ते वरकुटे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला काही शेतकऱ्यांनी गटारीच्या प्रवाह मध्येच अडवल्यामुळे तिथे साचलेले पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करून सुद्धा याकडे लक्ष दिले जात नाही. अखेर वैतागून सर्व शेतकरी हे करमाळा येथील बांधकाम विभागाच्या कारल्यामुळे उपोषणास बसले आहेत.

या पाण्यामुळे परिसरातील पाच ते सात एकर परिसर परिसरात वाहते पाणी घुसले आहे. शेतीचे नुकसान होत आहे. यावेळी संबंधित कार्यालयाला तक्रार करूनही अध्यापट्याकडे लक्ष दिले जात नाही. मागील काही दिवसांपूर्वी नाला अडवलेला सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने लेखी पत्र हनुमंत राऊत व इतर लोकांना दिले होते. पण 20 दिवस उलटले तरी अद्याप कोणतीच कारवाई झालेल्या नाही. त्यामुळे अखेर त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. विशेष म्हणजे या पत्रात आठ ते दहा दिवसात उचित कारवाई करण्यात येईल असे कळवण्यात आले होते पण अद्याप कारवाई न झाल्याने शेतकरी उपोषणासाठी बसले आहेत.

यासंदर्भात ग्रामपंचायतच्या वतीनेही सदर पाण्याचा स्त्रोत हा सुरळीत करण्यात यावा यासाठी ठराव पास केला आहे. तर तक्रारदार यांची काही वेळात तहसीलदार समीर माने यांच्यासोबत एक बैठक आहे. या बैठकीत पुढे काय निर्णय होतो याकडे लक्ष लागून राहिले आहे.

यावेळी विविध विकास सोसायटीचे चेअरमन हनुमंत राऊत,युवराज जाधव, विठ्ठल दगडु जाधव, अमोल जाधव,विठ्ठल उत्तम जाधव, प्रकाश जाधव आदी सह शेतकरी उपोषणासाठी बसले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE