करमाळाताज्या घडामोडीपंढरपूरबार्शीमंगळवेढामाढामाळशिरसमोहोळसोलापूर जिल्हा

रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडीसिवरसाठीची धावपळ थांबणार ; रेमडीसिवर पुरवठा नियमाप्रमाणे मिळणार

करमाळा समाचार


रेमडीसिवर इंजेक्शनच्या तुटवड्यावर आता प्रशासनाने गंभीर पावले उचलत संबंधित रेमडीसिवर इंजेक्शनच्या पुरवठा करण्याच्या उद्देशाने व रुग्णाची नातेवाईकांची धावपळ थांबवण्या करता ते डॉक्टरांनाच गरजेच्या इंजेक्शनची मागणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नातेवाईकांना धावपळ करण्याची गरज भासणार नाही. तर दवाखान्यात संबंधित रुग्णासाठी रेमडीसिवर इंजेक्शन मागवेल. त्यासाठीही बीलाप्रमाणेच पैसे द्यावे असेही सांगण्यात आले आहे.

मागील काही आठवड्यांपासून रेमडीसिवर इंजेक्शन तसेच ऑक्सिजन पुरवठा नसल्यामुळे अनेकांचा बळी जात होता. तर प्रत्येक कोविड हॉस्पिटल मधील डॉक्टर आपापल्या रुग्णासाठी रेमडीसिवर इंजेक्शन आणण्यासाठी आग्रह धरत होते. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांची इतरत्र धावपळ होत होती. व संबंधित रुग्णाचा नातेवाईक हा तहसील कार्यालय उपजिल्हा रुग्णालय तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे धावपळ करून दिसून येत होता.

परंतु याबाबत आता तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी थेट कोविड हॉस्पिटल यांना पत्र काढून संबंधित कामे ही दवाखान्याची असून विहित नमुन्यात अर्ज करून संबंधित रुग्णासाठी हे औषध मागवायचे आहे. जेवढ्या मागणी केली जाईल तेवढा पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्या असल्याने विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे परस्पर कोणीही इतर अधिकाऱ्यांना मागणी करायची नाहीये अशा सूचना देत असताना आपण जर थेट रुग्णाच्या नातेवाईकाला इंजेक्शनचा पुरवठ्याबाबत सांगत असाल तर गंभीर बाब असल्याचेही तालुका आरोग्य अधिकारी यांनी म्हटले आहे

संबधित रुग्णालयांनी करमाळ्यात दोन रुग्णालय आहेत त्यांना ही मागणी करता येणार आहे. 
1. प्रत्येक पेशंटचा बी फाँर्म भरुन
2. मागणी मा. अधिक्षक यांचेकडुन प्रमाणित करुन
3. लेटर हेडवर आमच्याकडे मागणी करावी

त्यानंतर त्यांचा एक प्रतिनिधी पैसे भरण्या करीता ( प्रत्येक डोस साठी 1500 च्या सुमारास रक्कम सोबत पाठवुन) पाठवुन द्यायचा आहे.
त्यानंतर वरील आदेशातील मेडीकल स्टोअर्स हे करमाळ्यातील डाँक्टरांच्या जवळील मेडीकल च्या नावे पावती करुन ती पावती डाँक्टरांचे प्रतिनिधी यांचेकडे ईंजेक्शन साठा सहीत देतील.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE