खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर करमाळा दौऱ्यावर ; थोड्याच वेळात पोंधवडीत कार्यक्रम
करमाळा समाचार
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे आज पोंधवडी तालुका करमाळा पोंधवडी चारी येथे असून त्या ठिकाणी पाणी पूजन त्यांच्या हस्ते होणारा असल्याची माहिती बीजेपी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. सकाळी साडेअकरा वाजता सदरचा कार्यक्रम होणार असून या ठिकाणी तालुक्यातील बीजेपी समर्थकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

तालुक्यातील इतर निवडणुका सध्या स्थगित असून त्यावर प्रशासक आहे. तर येणाऱ्या काळात बीजेपी लोकसभेच्या दृष्टीने पायमुळ घट्ट करण्यासाठी सध्या बीजेपीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी तालुका पातळीवर तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका व दौऱ्यांचा आयोजन सुरु आहेत त्या पार्श्वभूमीवर आजचा दौरा महत्वाचा आहे.
