खा. संजय राऊत यांच्या विरोधात शिवसैनिक (शिंदे गट) आक्रमक
करमाळा समाचार
मागील दोन ते तीन मुलाखतीमध्ये शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आमदार तसेच खासदार यांच्या बाबत बोलत असताना किंवा त्यांच्यावर प्रश्न विचारल्यानंतर थुंकल्यासारखे प्रकार केल्यामुळे आता वातावरण तापले आहे. करमाळा तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून शिवसैनिक आज एकत्र येत असून सकाळी अकरा वाजता पोलीस ठाण्यात हे निवेदन दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे यांनी दिली आहे.

या संदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सदरचा मेसेज सोशल माध्यमातून पाठवला आहे.
सत्ता गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या खासदार संजय राऊत यांचा निषेध करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. या मागणीची निवेदन देण्यासाठी करमाळा पोलीस ठाण्यात अकरा वाजता सर्व शिवसैनिकांनी, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित राहावे ही विनंती
-महेश चिवटे
शिवसेना जिल्हाप्रमुख
