वांगीच्या शेतकऱ्याची चिठ्ठी लिहुन आत्महत्या ; शेतकऱ्याच्या मृत्युनंतर कुटुंबीय न्यायाच्या प्रतिक्षेत !
करमाळा समाचार
जबरदस्तीने भाडेपट्टा वर सह्या करून घेऊन चार एकर शेतीवर कब्जा केल्याप्रकरणी मुबारक मेहबूब मुलाणी राहणार भिवरवाडी (वांगी क्रमांक एक) येथील शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सोलापूर येथील दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी मुबारक मुलानी यांनी मृत्यूपूर्वी एक पत्र लिहून माझ्या मृत्यू तिघेजण जवाबदार असल्याबाबत पत्रात नमूद केले आहे. तरी पत्रात इतरही सर्व गोष्टी लिहून मुलानी यांनी विष प्राशन केले होते. सर्वे नंबर 436 येथील भाडेपट्टीवर सही करून घेतले आहेत. सह्या न केल्यास तुला रान करून देणार नाही तू चार एकर कर , आम्हाला चार एकर दे असे लिहून घेतले. नंतर पाच दहा हजार करून 59 हजार रुपये दिले. हे सर्व दस्त हे दत्तात्रय आरकीले यांच्या हस्त लिखित स्वतःजवळ असल्याचेही त्यात नमूद केले आहे. तर चार एकर मी स्वतः वहिवाट होतो. त्यावर बँक लोन वर नोंदही आहे.

या प्रकरणात कोर्टाची ही यांनी दिशाभूल करुन निकाल लावून घेतले असल्याचे पत्रात उल्लेख केला आहे. तर मृत्यूस जबाबदार म्हणून मल्हारी, नारायण व दत्तात्रय आरकिले हे जबाबदार आहेत अशी नोंद या पत्रात केली आहे. याप्रकरणीतरी करार संपला असताना जमीन माघारी देत नसल्याची तक्रार आता मुलगा करत आहे. तर वडिलांच्या मृत्यू जबाबदार सर्वांवर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसला तरी करमाळा पोलीस ठाण्यात याबाबतची पुढील कारवाई सुरू आहे. नेमकं पोलिस या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.