करमाळासोलापूर जिल्हा

श्री उत्तरेश्वर ज्यु.कॉलेज केम येथील कु.लक्ष्मी देवकर महाराष्ट्र शासना कडून रोख दहा हजार रु. व प्रमाणपत्र देऊन सन्मानित

केम – करमाळा समाचार 

श्री उत्तरेश्वर जुनिअर कॉलेज केम येथील विद्यार्थिनी कु. लक्ष्मी दत्तात्रय देवकर हिला महाराष्ट्र शासन अंतर्गत समाजकल्याण विभाग कार्यालय, सोलापूर यांनी रोख दहा हजार रु. व सन्मान पत्र देऊन गौरवन्यात आले. महाराष्ट्र शासन अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) नागपूर यांच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत कु. लक्ष्मी देवकर हिचा सोलापूर जिल्यात प्रथम क्रमांक आला होता.

सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सोलापूर श्री कैलास आढे यांच्या शुभ हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सोलापूर याठिकाणी हा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री कैलास आढे, प्रा. डॉ. मच्छिन्द्र नागरे, कु लक्ष्मी देवकर, कु. नागराज मुळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्री राहुल काटकर, श्री दत्तात्रय देवकर, समाज कल्याण विभाग सर्व कर्मचारी, पालकवर्ग उपस्थित होते. यावेळी तालुका समनवयक श्री गणेश पवार यांनी आभार मानले.

केम सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या लक्ष्मी देवकर हिच्या अभूतपूर्व यशाबद्दल मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, प्राचार्य श्री विष्णू कदम, शालेय समिती अध्यक्ष श्री मोहनआबा दोंड, मा. आजीव सेवक श्री डि. व्ही. पाटील, सर्व उत्तरेश्वर हायस्कुल स्टाफ, ग्रामस्थ, विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

कु. लक्ष्मी देवकर हिला यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. तिला प्रा.गोपीनाथ शिंदे, प्रा.मालोजी पवार, प्रा.डॉ.मच्छिन्द्र नागरे, प्रा. संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, प्रा.अमोल तळेकर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE