कोरोना परिस्थितीत शेतात जैविक वस्तू इंजेक्शन व सलाईनच्या धोकादायक वस्तू सापडले
प्रतिनिधी सुनिल भोसले
करमाळा शहरालगत साहेबराव वाघमारे यांच्या शेतात धोकादायक वस्तु सापडल्याने परिसरात चर्चला उधान आले आहे.ज्या भागात रोज सकाळी तरूण वर्गासह वयोवृद्ध व्यायाम करण्यासाठी जातात आश्या वेळेस हवेत प्रदुषण होऊन जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तात्काळ संबंधित जैविक वापरलेल्या वस्तू टाकणाऱ्या वर कारवाई करावी करमाळा तहसिलदार समीर माने व करमाळा पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे.

कोरोना काळात वापरलेल्या सुई इंजेक्शन सलाईनच्या मोकळ्या बाटल्या व हॉस्पिटल व मेडिकल मधील टाकाऊ साहित्य माझ्या मालकीच्या शेतामध्ये काही व्यक्तींनी आणून टाकले आहे असे वाघमारे यांनी सांगितले तर हे साहित्य वाऱ्याने अस्ताव्यस्त उडत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जीवाला धोका निर्माण झाला असून यातील बहुतांशी मेडिसिन चिठ्ठ्या वर करमाळा शहरातील मेडिकल दुकानांची नांवे आढळुन येते आहेत. काही मेडिकलचा दिलेल्या निवेदनात उल्लेख केला आहे. त्यानुसार चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारे गैरकृत्य करणार्यावर कारवाई करावी अशी मागणी साहेब विठ्ठल वाघमारे रा. भीमनगर करमाळा यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या मालकीच्या गट नंबर तीनशे दहाच्या शेतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलमध्ये वापरलेले साहित्य पडले आहे. या ठिकाणी लहान मुले खेळतात जिथे हे वेस्टिज टाकले आहे. त्याच्या ठिकाणी सारा इंग्लिश मीडियम स्कूल आहे जवळच झाडबुके हायस्कूल आहे. कोरोना महामारी बर्ड फ्लू अशे साथीचे रोग वेगाने पसरत असताना अशाप्रकारे लोकांच्या जीविताला जीविताशी खेळ करणारे मेडिकल व्यवसायिक स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या शेतात अशाप्रकारे वेस्टेज टाकत आहेत. याबाबत फोटोसह तक्रारी आरोग्य अधिकारी करमाळा व तहसीलदार करमाळा यांच्याकडे केले आहेत ठिकाणचा पंचनामा करून कारवाई करावी अशी मागणी साहेब विठ्ठलराव वाघमारे यांनी केली आहे.