अतिवृष्टी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी
करमाळा समाचार
करमाळा प्रतिनिधी अचानक झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांनचे प्रचंड नुकसान झाले असल्याने त्वरित नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. तर पेरलेल्या ज्वारी काही शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या तर काही ढगफुटी झाल्याने बंधारे कॅनालच्या चाऱ्या फुटल्याने शेती वाहुन गेली.

तर काही ठिकाणी जनावरे दगावली गेली कोणाची घरे गुरांचे शेड पावसाने पडल्याने प्रचंड नुकसान झाले, तहसीलदार समीर माने यांनी त्यांच्या सिस्टीमला कामाला लावून योग्य चौकशी करून नुकसान झालेल्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावे अशी मागणी भिमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांनी माध्यमांशी बोलताना केली.

पुढे बोलताना म्हणाले, ज्या शेतकऱ्यांच्या शेती व पिकांचे नुकसान झालेलं आसल्यास किंवा सर्वसामान्यांचे पावसाने पडझड अथवा हानीकारक नुकसान झाले आसल्यास काही कारणामुळे तालुकास्तरीय मदत कार्य यत्रंना तेथे पोहचली नसेल तर माझ्याशी संपर्क साधावा असे भोसले म्हणाले .