E-Paperकरमाळाकृषीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

बाजार समितीत लिलाव बंद पडल्याने शेतकऱ्यांना फटका ; बाजार समीतीत हमी भावापेक्षा जास्त सरासरीची नोंद तरीही गोंधळ

करमाळा समाचार 

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उडीदाच्या हमीभावासाठी काल आंदोलन करीत लिलाव बंद ठेवण्यात आले. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाच याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीत मिळत असलेल्या भावापेक्षाही कमी भावात बाहेर विक्री करून शेतकरी आपला शेतमाल विकून जात असल्याचे दिसून येऊ लागले आहे. यामुळे बाहेरच्या व्यापाऱ्यांना याचा फायदा होत आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत तीस हजार कट्टे उडीद आलेला आहे. तर या ठिकाणी सर्वाधिक 8700 भाव मिळाल्याचे दिसून आले आहे. तर सर्वात कमी 6000 भाव देण्यात आला आहे. या ठिकाणी उडीद व शेतमालाची प्रत पाहून त्याची ग्रेड ठरवण्यात येते व हमीभावाच्या आसपास सदरचा दर दिला जातो. मुळातच 7400 हमीभाव असताना 8700 इथपर्यंत भाव देण्यात आलेला होता. तर ज्यांचा ग्रेडमध्ये बसत नाही अशांना 6000 पर्यंत ही भाव देण्यात आलेला आहे. यापूर्वीचे व्यवहार अशा पद्धतीने झालेले असताना कालच गोंधळ घालण्यात आला.

politics
काल सर्वाधिक भावाची पट्टी

बाजार समितीमध्ये 30000 कट्टे खरेदी करून घेत असताना सरासरी या ठिकाणी 7600 भाव देण्यात आलेला दिसून आला आहे. तर कालही 1282 पिशव्यांची आवक पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक सात हजार सहाशे हा भाव देण्यात आला होता. पण काही शेतकऱ्यांच्या मालात त्रुटी काढत त्यांना भाव कमी देण्याचे प्रकरण घडल्यावर त्यामध्ये गोंधळ निर्माण झाला व तिथून पुढे सर्वच कामकाज ठप्प पडले.

सदरचे निलाव बंद पाडण्यात आले व आजही सदर निलाव बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांना स्वतःचा माल हा बाहेर विक्री करावा लागत आहे. त्या ठिकाणी ग्रेड पाहिली जात नाही. सरसकट मालाला एकच भाव दिला जात आहे. यातून शेतकऱ्यांना भावही कमी मिळत आहे व यामुळे शेतकऱ्यांचे हाल होताना दिसून येत आहेत. बाजार समितीमध्ये होत असलेले निलाव पुन्हा एकदा सुरू होण्याची गरज आहे. ज्यांना भाव पटत नसतील अशांनी निलावात सहभाग न नोंदवता बाहेर माल नेले तर काहीच हरकत नसावी. पण संपूर्ण निलाव बंद पाडणे हे कितपत योग्य असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

याठिकाणी उपस्थित शेतकरी प्रतिनिधी म्हणाले बाहेरच्या पेक्षा करमाळ्यात कमी भाव दिला जात आहे. येथील भाव पाच ते सहा हजारापर्यत आल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यासाठी दि ११ रोजीही आंदोलन करणार आहेत.

करमाळा बाजार समितीमधे शेतकऱ्यांसमक्ष उघड लिलाव , प्रतवारी व विक्री केलेल्या शेतमालाची २४ तासात मापे केली जातात व पट्टी दिली जाते . शेतमालाचा भाव बाजार समिती ठरवित नाही , तर शेतकरी व व्यापारी यांच्यातील दुवा म्हणून नियंत्रण ठेवण्याचे काम बाजार समिती करते . शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये , जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे . शेतकऱ्यांनी msamb ॲपवर अथवा फोनवर अन्य बाजार समितीमधील भावाची चौकशी करावी व भाव मान्य असल्यासच शेतमालाची विक्री करावी . सध्या बाजार समितीमधे उडीदाची आवक प्रचंड असून व्यापारी व हमालांची संख्या त्यांची कार्यक्षमता आदी बाबींचा विचार करता शेतकऱ्यांनी सहकार्य करावे .काही विघ्नसंतोषी लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये . प्रतिदिनी ५ ते १० हजार क्विंटल आवक असल्यामुळे ३ ते ४ कोटीची उलाढाल होत असून सणासुदीच्या तोंडावर बाजारपेठेत चैतन्य पसरले आहे यास दुष्ट लावण्याचे काम काही नतद्रष्ट मंडळी करीत असून शेतकऱ्यांनी वेळीच सावध व्हावे. अन्यथाशासनाकडून हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे बाजार समितीकडून गोदाम , धान्य चाळणी यंत्र आदी बाबी बाबीसाठी संपूर्णपणे सहकार्य केले जाईल : जयवंतराव जगताप (माजी आमदार तथा सभापती बाजार समिती करमाळा .

करमाळा बाजार समितीत पारदर्शक कामकाज असून अन्य बाजार समितींच्या तुलनेत उडीदाला जादा मिळत भाव आहे .faq दर्जाच्या मालाला हमीभावापेक्षा जादा दर असून non faq शेतमालाची विक्री शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय न करणे बाबत अडते व्यापारी खरेदीदार यांना सुचना दिलेल्या आहेत -: विठ्ठल क्षिरसागर ( सचिव , बाजार समिती करमाळा )

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE