५१ ग्रामपंचायतीची छाननी पुर्ण दहा गावातील पंधरा अर्ज अवैध
करमाळा समाचार
तालुक्यातील 437 जागांसाठी एकूण 1447 अर्ज अर्ज आलेले आहेत. तर आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये 15 अर्ज अवैध अर्ज तर आठ अर्ज दुबार असल्याने बाद करण्यात आले आहेत. तर अजूनही दोन जागांवर हरकत घेतल्यामुळे दोघांच्या सुनावणीचा निकाल अद्या राखुन ठेवला आहे.

तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीचे रणधुमाळी कोरोना काळामुळे एकाच वेळी सुरू झाल्याने तालुक्यात सर्वत्र फक्त निवडणूक चर्चा आहेत. तर आता विधानसभेत सारखे स्वरूप त्याला निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी ग्रामपंचायतीचे निवडणुका असल्याने प्रशासनावर ही मोठा ताण आला आहे. पण अतिशय व्यवस्थितपणे हाताळत प्रशासन याची छाननी पूर्ण केली आहे. या छाननीत 1447 पैकी फक्त पंधरा अर्ज अवैध ठरले आहेत. तर आठ अर्ज एकाच व्यक्तीने दोनदा भरल्यामुळे अवैध ठरवले आहेत. संबंधित उमेदवारांचे एक अर्ज मंजूर झाल्यामुळे त्यांची उमेदवारी आजही आबादित आहे. तर दिनांक चार तारखेला अर्ज माघार घेण्याच्या दिवशी संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

हिवरवाडी २
सावडी १
सालसे १
नेरले – ३
कविटगाव २
सांगवी १
पोथरे १
गुळसडी १
करंजे २
दिलमेश्वर १