E-Paper

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख प्रकरणात औरंगाबाद पोलिसांचा मोठा खुलासा ; शेख यांच्या डोळ्यात पाणी

करमाळा समाचार 

राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता औरंगाबाद पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मागील 1 वर्षात आरोपी आणि फिर्यादी संपर्कात नसल्याचा खुलासा पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी केला आहे.

औरंगाबाद पोलिसांनी मेहबूब शेख यांच्यावर झालेल्या आरोपांचा तपास करण्यासाठी 3 पथकं तयार केली आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवून घेतले आणि त्यानंतर गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती.

दरम्यान मेहबूब शेख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.तपास अधिकाऱ्यांना फोन करुन माझी तक्रारदार तरुणीशी काहीच ओळख नसून कधीही भेटलो नाही अशी माहिती दिली. माझे फोन रेकॉर्ड तपासा, हवं तर नार्को टेस्ट करा असं सांगितलं”.

“सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा राजकारणात मोठ्या पदावर गेल्यानंतर त्याचं राजकीय करिअर अशा खोट्या केसेस करुन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असेल तर हा दुर्दैवी प्रकार आहे. मी दोषी असलो तर कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे. खोट्या केसेस करून फक्त राजकीय द्वेषापोटी कोणी केलं आहे का याचाही पोलिसांनी तपास करावा,” असं मेहबूब शेख यांनी सांगितलं आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE