कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मयताच्या नातेवाईकांना सरकारकडुन आर्थिक मदत
करमाळा समाचार
कोविड – 19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सहाय्य प्रदान करणे बाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती covid-19 या आजारामुळे निधन पावली आहे. त्यामुळे त्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50 हजार रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीतून पदार्थ करण्याची शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

हे सानुग्रह सहाय्य covid-19 मृत्यू rt-pcr व रॅट चाचण्यांमधून पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचे क्लीनिकल डायगणोसिस covid-19 झाले आहे. याच व्यक्तीचे प्रकरण covid-19 मृत्यू प्रकरणासाठी ग्राह्य म्हणून समजण्यात येईल.

कॉविड 19 प्रकरणात अशा व्यक्तीचा मृत्यू चाचण्यांच्या बाधीत दिनांकापासून किंवा रुग्णालयात उपचार सुरू असल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत झाला असल्यास अशा व्यक्तीच्या मृत्यु 19 चा मृत्यू समजण्यात येईल. जरी हा मृत्यु रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने covid-19 निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी त्याला हा नियम लागू नाही.
Covid-19 च्या प्रकरणात ज्या व्यक्तीचा रुग्णालयांमध्ये दाखल असताना मृत्यू झालेला असेल तरी 30 दिवसाच्या नंतर झाला असेल अशा व्यक्तीचा मृत्यू देखील covid-19 चा मृत्यू समजण्यात येईल.
निधन पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी राज्यशासनाने याकरिता विकसित केलेल्या वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. यासाठी अर्जदार स्वतः किंवा सेतू केंद्रातील किंवा ग्रामपंचायत मधून अर्ज करू शकेल.