करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उजनी जलाशयात बुडालेल्या सहा पैकी पाच जणांचा शोध लागला

करमाळा समाचार

उजनी जलाशयात झालेल्या दुर्घटनेनंतर दोन दिवसांपासून शोध सुरु होता. यात आता दोन लहान मुलांचा शोध लागला असून आणखी तीघांचे मृत शरीर मिळून आल्याची माहिती मिळत आहे. नेमके ते कोणाचे आहेत याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. कुगाव येथील अनुराग ज्ञानदेव अवघडे (वय २८) व गौरव धनंजय डोंगरे (वय २४) तर झरे येथील गोकुळ जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव (वय २५), माही गोकुळ जाधव (वय ३) व शुभम गोकुळ जाधव (दिड वर्ष) हे बेपत्ता झाले होते. त्यातील पाचजणांचे मृतदेह सापडले आहेत.

उजनी धरणात कुगाव (ता. करमाळा) ते कळाशी (ता. इंदापूर) या दरम्यान बोट उलटून झालेल्या अपघातात झरे (ता. करमाळा) येथील पती-पत्नी व त्यांची दोन लहान मुले तसेच कुगाव (ता. करमाळा) येथील दोघे, असे सहाजण बुडाले होते. या दुर्घटनेत एकजण कळाशीकडे पोहत आल्याने बचावला असून इतरांचा शोध सुरू होता.

मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीमा नदीच्या पात्रात करमाळा तालुक्यातील कुगाव येथून ही बोट इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे येत होती. त्यात कुगाव व झरे (ता. करमाळा) येथील सात प्रवासी होते. यावेळी जोरदार वादळ सुटल्याने ती बोट उलटली. कुगाव ते काळाशी दरम्यान दररोज या बोटीने प्रवासी वाहतूक केली जाते. दिवसातून साधारणतः ही बोट १० ते १५ फेऱ्या मारते. मात्र, मंगळवारी सायंकाळी बोट बुडून मोठी दुर्घटना घडली. धरणात बुडाल्यांमध्ये एक महिला, तीन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE