करमाळाकृषीताज्या घडामोडीबार्शीमाढामाळशिरससांगोलासोलापूर जिल्हासोलापूर शहर

महाग्रामसाठी जिल्ह्यातील २२ गावांत करमाळ्यातील पाच ; कृषीसह सहा क्षेत्रात सुधारणा

करमाळा – विशाल घोलप


कृषी, ग्रामीण गृहनिर्माण, आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण, उपजीविका व जलसंधारण यासारख्या विषयांवर काम करण्यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासन यांच्यात करार झाल्यानंतर आता मिशन महाग्राम योजना लागू करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाच जिल्ह्यांमधून १०१ गावांचा तर सोलापूर जिल्ह्यातील २२ गावांचा यामध्ये समावेश असणार आहे.

ग्रामसामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि भारतीय साधारण विमा महामंडळ यांच्यामध्ये राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये पंधरा तालुक्यांमध्ये ८८ ग्रामपंचायती अंतर्गत असलेले १०१ गावांमध्ये मिशन महाग्राम राबवण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ११ मार्च २०२४ रोजी मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला होता. यामध्ये कृषीव कृषी संलग्न क्षेत्र, ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्र, ग्रामीण आरोग्य क्षेत्र, ग्रामीण पुरवठा व स्वच्छता जलसंधारण क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, उपजीविका क्षेत्र अशा वेगवेगळ्या भागात काम केले जाणार आहे. याबाबतचा आराखडा संबंधित गावातुन मागवण्यात आलेला आहे. यामुळे कृषी, शिक्षण व आरोग्यावर प्रभाव पडुन सुधारणा होण्यास मदत होईल.

विभागनिहाय कामे …
कृषी –
जागतिक बँक अर्थसाहाय्यक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय, ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आदीच्या मदतीने उत्पादक भागीदारी उपप्रकल्प विकसित करून तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य करणे. उपप्रकल्प विकसित करणे, कृषी उद्योजकांची फळी निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या संस्थांना बाजार जोडणीसाठी सहाय्य करणे.

ग्रामीण गृहनिर्माण –
महाआवास योजना अभियान प्रभावी राबवणे, घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग, रंगरंगोटी, परसबाग, सौर ऊर्जा व्यवस्था, घरकुल मार्ट उभारणी करून वस्तू सेवा उपलब्ध करून रोजगार निर्माण करणे. नैसर्गिक आपत्ती विरोधी घरे, लिस्ट कॉस्ट, टेक्नॉलॉजी, किफायतीशीर घरे बांधणे

ग्रामीण आरोग्य क्षेत्र –
गाव तेथे दवाखाना टेली मेडिसिन व्यवस्था व जनरिक औषधी उभारणे, गावातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक उपकेंद्रे, पारसबाग निर्मिती व कुपोषण मुक्त गाव संकल्पना राबवणे.

ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता जलसंधारण-
स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी व्यवस्थापन तसेच कचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन पाण्याचा चक्रीय वापर व्यवस्थापन करणे.

शिक्षण क्षेत्र –
डिजिटल स्कूल, ऑनलाईन शिक्षण, साहित्य व्यवस्था विकसित करून वाचन अभियानाद्वारे मुलांना वाचनाची आवड लावणे. आदर्श शाळांची निर्मिती करणे.

उपजीविका क्षेत्र –
प्रकल्पातील गावांमधून स्वयंसहायता गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्थांना कृषी व अकृषी क्षेत्रांना उत्पन्न रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वर्कशॉप व इतर कॉप शॉप उभारण्यास मदत करणे ग्रामपंचायत इ पोर्टल आणि सुविधा विकसित करणे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय गावे ..
करमाळानेरले, वरकुटे, पाथर्डी, घोटी, आळसुंदे,

माढा – मुंगशी, बिटरगाव, शिंगेवाडी, रोपळे -कव्हे

सांगोला – काटफळ, भालेवाडी(मुहुद), मुहुद, गायगव्हाण, करांडेवाडी (माहीम), माहीम,

माळशिरस – तांदुळवाडी, फलावणी, कोळेगाव, कलामवाडी,

बार्शी – शेलगाव, धामनगाव (धुमला), राळेरास
आदि गावांचा समावेश आहे.

कृषी, ग्रामीण गृहनिर्माण, आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण, उपजीविका व जलसंधारण क्षेत्रात बावीस गावात काम होणार आहे. तसेच जिल्हा परिषदेने जे आदर्श गावाचे मॉडेल तयार केले आहे त्याची व या अभियानाची सांगड घातली जाईल व सदरची गावे आदर्श केली जातील. यामध्ये निवड झालेल्या गावातील सरपंच ग्रामसेवक इतर क्षेत्रीय अधिकारी यांची मिटींग बोलवण्यात येणार आहे त्यावेळी त्यांच्याकडुन आराखडा तयार करुन घेणार आहोत.
मनिषा आव्हाळे, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि. प. सोलापूर.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE