घारगावात पहिल्यांदाच एकहाती सत्ता ; सात पैकी सात जागांवर विजय
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या घारगाव ग्रामपंचायतीवर नारायण आबा पाटील गटाने किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत बागल गटाचा धुव्वा उडवत सर्व सातच्या सात जागा जिंकून एक ऐतिहासिक विजय मिळवला.

घारगाव ग्रामपंचायत स्थानापासून आजवर कोणत्याही पक्ष किंवा गटाला एक हाती सत्ता मिळाली नव्हती. स्थापितांना धक्का देत
ही किमया नारायण आबा पाटील गटाच्या श्री काळभैरवनाथ ग्रामविकास पॅनेल ने केली आहे.

या निवडणुकीत वाॅर्ड क्रमांक 1 मधुन सुलोचना पाटील , अनिता भोसले, कविता होगले वाॅर्ड क्रमांक 2 मधुन आशा देशमुखे, दत्तात्रय मस्तुद, वाॅर्ड क्रमांक 3 मधुन लक्ष्मी सरवदे ,सतिश पवार हे सात उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. मा.आमदार नारायण आबा पाटील यांनी सत्कार करत सर्व उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यापुढे सर्वांना विश्वासात घेऊन गावातील विकास करून गट तट न पाहता ग्रामपंचायतीचा कारभार केला जाईल असे प्रचार प्रमुख किरण पाटील यांनी सांगितले.