करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी प्ररप्रांतीयांकडुन जबरदस्तीने वसुली ; एंट्री माफिया पुन्हा सक्रिय

करमाळा समाचार 

जिल्ह्याच्या सीमेवर असल्याचा फायदा घेत करमाळा तालुक्याच्या सीमेवर पुन्हा एकदा अज्ञातांकडून एन्ट्री वसुली केली जात असल्याबाबत माहिती मिळाली आहे. याबाबत समाज माध्यमातून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या असून या ठिकाणी दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पोलिसांच्या नावाने एन्ट्री केली जात आहे. काही दिवसांपूर्वी अशीच एन्ट्री करताना करमाळ्यातील एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा सदरची एन्ट्री सुरू झाल्याने यामागे कोणाचा हात आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे.

करमाळा तालुक्यातील जातेगाव व अहमदनगर जिल्ह्यातील चापडगाव या दोन्ही गावांच्या हद्दीवर प्रवेश करताना सदरची एन्ट्री गोळा केली जात आहे. जिल्ह्यात प्रवेश करताना माल ट्रक व परप्रांतीय वाहनांकडून जबरदस्तीने पैशांची वसुली केली जात आहे. सदरचा आकडा पाचशे ते एक हजार रुपयांपर्यंत असून सर्रास प्रत्येक गाडी कडून तो वसूल केला जात आहे. त्याच्या माध्यमातून मोठी उलाढाल होताना दिसत आहे. याच्यातून अनेकदा वादही होतात पण त्या लोकांना तक्रारी देण्यापर्यंत येऊ दिले जात नाही किंवा ते शुल्लक रकमेसाठी दिवस वाया घालवण्यासाठी करमाळा पर्यंत पोहोचत नाहीत. त्याचा फायदा सदरची लोक उचलत असल्याचे दिसून येत आहे.

politics

या प्रकारामध्ये मागील काही कार्यकाळात पोलिसांसाठी काम करत असलेल्या युवकांचा समावेश आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बाहेरून आलेल्या एका पोलिसाचे नाव त्यामध्ये चर्चेत असले तरी अद्याप ठोस पुरावा त्यांच्या विरोधात नाही त्यामुळे उघडपणे संबंधित पोलिसाचे नाव आत्ताच जाहीर करणे घाईचे ठरु शकते. त्या ठिकाणी जवळपास दहा ते बारा युवकांच्या माध्यमातून एन्ट्री वसूल केली जात आहे. विशेष म्हणजे इतके नियोजनबद्ध काम सुरू आहे की या युवकांना वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये योग्य ते काम देऊन सदर वसुली केली जात आहे. वसुलीचा पैसा कुठपर्यंत जातोय याचा शोध घेणे गरजेचे आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE