करमाळ्यात नव्याने चार बाधीत ; 310 बरे झाल्याने 100 वर उपचार
करमाळा समाचार
तालुक्यात आज एकूण 56 टेस्ट घेण्यात आल्या. त्या सोलापूर येथे तपासणीसाठी पाठवल्या आहेत. तर यापूर्वी 24 चे अहवाल अजून येणे बाकी आहेत असे तब्बल 80 अहवाल प्रतीक्षेत आहेत. उपलब्ध रॅपिड टेस्ट किट च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या टेस्टमध्ये चार बाधित आढळले आहेत. 29 जणांवर उपचार पूर्ण होऊन ते घरी गेल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या 310 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. तर 100 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आज पर्यंतच्या बाधीतांचा आकडा 419 पर्यंत जाऊन पोहोचला आहे.


शहर परिसर –
विद्या नगर -3
कमलाई नगर 1