करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासाठी ढोल आंदोलनाला करमाळ्यातुन सुरुवात

करमाळा समाचार 

धनगर समाजाच्या घटनादत्त अनुसूचित जमाती च्या आरक्षण अमलबजावणी च्या मागणीसाठी आज करमाळा इथून ढोल वाजवत पश्चिम महाराष्ट्रातील एल्गार आंदोलनाला सुरवात करण्यात आली. येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात शेकडो धनगर बांधवांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी ची मागणी करत तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याना निवेदन सादर केले. यावेळी धनगर समाजाच्या आरक्षण अमलबजावणी बाबत च्या मागणीचा जयघोष करमाळा तहसील आवारात घुमला.

आज सकाळी 11.30 वाजता करमाळा क्रषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती धनगर आरक्षण क्रती समितीचे सदस्य प्रा शिवाजीराव बंडगर, पंचायत समिती चे माजी सदस्य विलास पाटील, आदिनाथ चे माजी संचालक धुळा भाऊ कोकरे ,विठ्ठल शिंदे, डाॅक्टर अशोक शेळके ,प्रकाश कोळेकर, बाळासाहेब टकले,आदिसह धनगर बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात तहसील कचेरीत प्रवेश केला.

निवेदन सादर करताना प्रा शिवाजीराव बंडगर म्हणाले भारतीय राज्य घटनेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जमाती च्या आरक्षणात कलम 342 मधे स्पष्ट तरतूद केली असताना धनगड या अस्तित्वहीन जमाती ला पुढे करून सत्तर वर्षे झाली तरी प्रत्येक सत्ता धार्यानी शब्दच्छल करत धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा घोर अपराध केला आहे . अनेक आश्वासण दिली गेली परंतु अमलबजावणी च्या नावाने बोंब केली. त्यामुळे धनगर समाजात प्रचंड असंतोष असून महाविकास आघाडी सरकारने आता वेळ न दवडता अंमलबजावणी करावी .

निवेदनात आरक्षण अंमलबजावणी बरोबरच जलदगती न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयात असलेल्या याचिकेची सुनावणी सुरू करावी,मागील सरकारने जाहीर केलेल्या अनुसूचित जमाती च्या सवलती लागू करून एक हजार कोटी रूपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून ध्यावा ,मेंढपाळा साठ त्यांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा बनवावा इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब टकले यांनी केले.या प्रसंगी रासप चे तालुका ध्यक्ष अंगद देवकते, सरपंच दादा कोकरे, संदीप मारकड,भिवाजी शेजाळ, सतीश मोटे ,विक्रांत शिंदे, हिरा चौगुले, अशोक घरबुडे, महादेव पोरे, चंद्रकांत शिंदे, चंद्रशेखर पाटील, मल्हारी मारकड, अंकुश शिंदे, अरूण शेळके, संतोष कोपनर, बबन शिंदे, धनंजय शिंदे, तानाजी भोंगे,सुरेश शिंदे, राहुल पाटोळे, रावसाहेब शिंदे, किरण बोरकर,राहुल गडदे, भैरवनाथ बंडगर आदी सह धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  आभार डाॅक्टर अशोक शेळके यानी मानले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE