चार चोर, नऊ तोळे, पण मिळाले तीन तोळे, सहा गेले कुठे? आकड्यांची तफावत – नेमके गौडबंगाल काय ?
करमाळा – प्रतिनिधी

जून 2025 मध्ये घडलेल्या घटनेची नव्याने यामध्ये तब्बल नऊ तोळे सोने चोरीला गेले असून त्यातील चार आरोपींना पोलिसांनी पकडले असले तरी अद्यापही सहा तोळे सोने मिळून आलेले नाही. सदरचे संशयित आरोपी हे आता सध्या दुसऱ्या जेलमध्ये असून त्यांच्याकडून उर्वरित सोन हस्तगत करणे आव्हानात्मक असल्याचे दिसून येत आहे. त्यातही या प्रकरणी उलट सुलट चर्चांना उधान आल्याचे दिसत आहे.

करमाळा तालुक्यातील वांगी क्रमांक एक येथील रवींद्र देशमुख रस्त्याने जात असताना खडकेवाडी फाट्यापुढे बिले पेट्रोल पंपा जवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास मोटरसायकलवर जात असताना त्यांच्याजवळ काही अनोळखी इसम आले व आपण पोलिस असल्याचे भासवुन त्यांनी पुढे जाऊ नका मर्डर झाला आहे असे सांगितले व त्यांच्या जवळील सोने पिशवीत टाका म्हणाले नंतर संबंधित चोर हे पसार झाले होते. यावेळी त्यांच्याकडून जवळपास नऊ तोळे सोने चोरीस गेले होते.
सदर संशयित आरोपींचा माहितीवरून शोध घेत असताना सहा महिने उलटले तरी संबंधित चोर हे मिळून आले नव्हते. काही दिवसांपूर्वी ते बाहेरच्या जेलमध्ये असल्याच्या सूचना मिळाल्या त्यावरून तपास अधिकारी श्री. पाखरे यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी तीन तोळे सोने मिळून आले. पण चारही आरोपी ताब्यात असताना अद्याप उर्वरित सहा तोळ्यांचा तपास न लागल्याने पुढे तपास होऊन सोने मिळणे सध्या आव्हानात्मक होऊन बसले आहे.

पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटण्याची घाई…
संबंधित प्रकरणात सर्व संशयित आरोपी हे दुसऱ्या पोलिसांनी पकडलेले होते. तेथून सदरची माहिती मिळाल्यानंतर यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडून मिळालेल्या तीन तोळे सोन्याची प्रसिद्धी करमाळा पोलिसांनी करीत असताना चोरीला जात असताना फिर्यादीमध्ये तीन तोळ्याची किंमत एक लाख 80 हजार दाखवलेली होती. तर सोने ताब्यात आल्यानंतर सदरची चोरीतील तीन तोळे हे साडेचार लाख रुपयांचे असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे गेलेल्या व सापडलेल्या सोन्याच्या रकमेत तफावत दिसून येत आहे. त्यामुळे वाढीव रक्कम दाखवून पोलीस स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याचे दिसत आहे.
चोरीच्या फिर्यादीत केवळ तीन तोळ्याचा उल्लेख नंतर सहा कसे वाढले…
सदर प्रकरणात ज्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी तीन तोळ्याचे एक लाख 80 हजार रुपये प्रमाणे सोने चोरीला गेले असल्याची माहिती देण्यात आली होती. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु त्याचवेळी सोने चोरीला गेले असून इतर सोन्याची वाढीव नोंद पुन्हा पुरवणी जबाब करण्यात आली. मग सुरुवातीलाच सदरची नोंद का केली केली गेली नव्हती ? खरंच त्या दिवशी सोन चोरीला गेलं होतं का ? किंवा घटना मोठी भासू नये म्हणून त्या दिवशी टाळले होते का ? असे वेगवेगळे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.
चोरीला गेलेल्या सोन्याची नोंद पुढील प्रमाणे …
गळ्यातील चेन एकूण 30 ग्रॅम किंमत रुपये एक लाख 80 हजार,(मुळ फिर्यादीत याचाच उल्लेख), नंतर वाढले हातातले सोन्याचे ब्रेसलेट चाळीस ग्रॅम किंमत दोन लाख 40 हजार, बोटातील पिळ्याच्या दोन अंगठ्या 20 ग्रॅम एक लाख वीस हजार असे एकूण पाच लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार असून संबंधित संशयीतांना ताब्यात घेऊन पोलीस कोठडी संपल्यानंतर बाहेर राज्यातील जेलमधून आणले होते त्या ठिकाणी सोडण्यात आले आहे.

