करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उस वाहतुकदाराची फसवणुक आंदोलनानंतर पहिला गुन्हा दाखल

करमाळा समाचार

साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करण्यासाठी कामगार पुरवठा करणाऱ्या मुकादमाला दहा लाख रुपये दिले. तरीही त्याने आज तागायत एकही कामगार दिला नाही. शिवाय पैसेही माघारी देण्यास सहकार केला या प्रकरणी मुकादमावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद चंद्रकांत जाधव सांगवी क्रमांक दोन यांनी दिली आहे. मागील आठवड्यात (ठाकरे) शिवसेनेच्या वतीने शंभुराजे फरतडे यांनी या संदर्भात आंदोलन केले होते त्या नंतर सदरचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

कानीलाल डोंगर सोनवणे रा. कालटेक ता. साखरी धुळे या मुकादमावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत जाधव हे ऊस वाहतुकीचे काम करतात ते बारामती ॲग्रो लिमिटेड शेटफळगडे ता. इंदापूर या ठिकाणी ऊस वाहतूक करतात.

त्यासाठी त्यांना कामगारांची गरज होती. या निमित्ताने ते धुळे जिल्ह्यातील कानीलाल सोनवणे यांना भेटले. यावेळी वीस जोड्या व ४० लेबर पुरवण्याचा करार करण्यात आला, यासाठी अकरा लाख रुपये ॲडव्हान्स व उर्वरित रक्कम गळीत हंगाम झाल्यानंतर देण्याचे ठरले होते, त्याप्रमाणे २३ जून २०२३ पासून ते १४ सप्टेंबर २०२३ पर्यंत वेळोवेळी सोनवणे यांना रक्कम पोहच करण्यात आली अशी एकूण दहा लाख रुपये सोनवणे यांना देण्यात आले होते.

नंतर वीस सप्टेंबर रोजी सोनवणे यांनी टोळी घेऊन जावा व उर्वरित एक लाख रुपये द्या म्हणून जाधव यांना बोलवून घेतले. पण लाख रुपयांचा तगादा लावला पण एकही कामगार उपस्थित नसल्याने जाधव यांच्याकडुन पैसे देण्यासाठी नकार देण्यात आला. त्यावेळी सोनवणे याने टोळी देत नाही आणि पैसेही देत नाही म्हणून वाद घालू लागला.

त्यावेळी त्याच्या भितीपोटी जाधव हे माघारी करमाळा येथे आले. जाधव यांनी वारंवार पैसे मागितले परंतु आज तागायत त्यांना पैसे न मिळाल्यांर सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने हे करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE