करमाळ्यात आज मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप कार्यक्रम
करमाळा समाचार
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा व शिवसेना युवा सेनेच्या वतीने शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवारी 26 मार्च 2021 रोजी सकाळी 9 ते दुपारी पाच वाजेपर्यंत करमाळा कुटीर रुग्णालय येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप कार्यक्रम होणार आहे.

या शिबिराचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे चेअरमन विलासराव घुमरे यांच्या शुभहस्ते होणार आहे. डोळे तपासणी करून ज्या रुग्णांना या नंबरचा चष्मा लागत आहे. तो चष्मा तात्काळ त्यांना मोफत देण्यात येणार आहे. तरी गरजूंनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

नेत्र तपासणीसाठी येताना मास्क लावण्याची यावे
तपासणीसाठी ठाणे येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ येणार आहेत. तरी सर्वांनी आपल्या परिचयाच्या सुद्धा ज्यांना गरज आहे अशा लोकांना याची माहिती द्यावी.
– महेश नरसिंह चिवटे,
उपजिल्हा प्रमुख शिवसेना