पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबीर ; तालुका महिला राष्ट्रवादीचे आयोजन
करमाळा समाचार
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिलांसाठी मोफत हिमोग्लोबीन तपासणी शिबीर तसेच त्यावर उपचारार्थ औषध वाटप कार्यक्रमाचे आयोजन सरकारी रुग्णालय, करमाळा येथे करण्यात आले.

यावेळेस महिलांचा उदंड प्रतिसाद बघायला मिळाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा नलिनीताई जाधव, उपाध्यक्षा नंदिनी लुंगारे, शहराध्यक्षा राजश्री कांबळे, बार कौन्सिल अध्यक्षा सविता शिंदे, युवती तालुकाध्यक्षा शितल क्षीरसागर, कार्याध्यक्षा स्नेहल अवचर, उपाध्यक्षा रूपाली अंधारे, सरचिटणीस मनिषा झिंझाडे, तालुकाध्यक्ष संतोष वारे, शहराध्यक्ष शिवराज जगताप, प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंझाडे, जिल्हा सरचिटणीस गौरव झांजुर्णे, जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, शहर उपाध्यक्ष आझाद शेख, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा सदस्य महेश काळे, खजिनदार अरुण तांगडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमास आरोग्य अधिकारी डाॅ. राहुल कोळेकर यांचे विषेश सहकार्य लाभले. तसेच भोसले मॅडम आणि ढाकणे मॅडम यांनी महिलांची तपासणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गौरव झांजुर्णे यांनी केले तर आभार तालुकाध्यक्षा नलिनीताई जाधव यांनी मानले.