करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आठ महिणे झाले तरी जेलरचीच गाडी मिळेना तपास यंत्रणेचे अपयश चर्चेचा विषय

करमाळा समाचार

करमाळा पोलीस ठाणे अंतर्गत सर्व कैद्यावर नजर ठेवणाऱ्या व त्या कायद्यांच्या आवश्यक गोष्टी त्यांना पुरवठा करणाऱ्या जेलरचीच गाडी चोरीला जाऊन आठ महिने उलटले तरी अद्याप चोरीच्या गाडीचा तपास लागला नसल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. जर ज्वेलरचीच गाडी मिळवून येत नसेल तर बाकीच्यांच्या गाड्यांचे काय ? सदरची मोटरसायकल 9 मे 2025 रोजी गेली होती.

याबाबत अधिक माहीती अशी की , करमाळ्यात जेलर म्हणून काम पाहणारे अधिकारी हे कैद्याना भेटण्यापासून त्यांच्या गरजा व त्यांच्या जेवण खान यावर विशेष लक्ष देऊन असतात. प्रत्येक कैदी हा त्यांच्या संपर्कात असतो. तर तेही जातीने त्यांच्याकडे लक्ष देतात. पण त्यांची चोरी झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. त्याहून चिंतेची बाब म्हणजे एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचीच चोरलेली मोटरसायकल आठ महिणे उलटले तरी मिळून येत नसेल तर किती शरमेची बाब म्हणावी लागेल अशी चर्चा सध्या सुरू आहे.

दि.09 मे 2025 रोजी रात्री 10/45 वा सुमारास संबंधित अधिकारी यांनी मो/सा होन्डा युनिकार्न एमएच 45, एपी 6796 हि जेउर येथील राहते घरासमोर पार्क केलेली होती. त्यानंतर आम्ही घरातील सर्वजण जेवण करुन झोपले. त्यानंतर दि. 10/05/2025 रोजी सकाळी 06/00 वा.चे दरम्यान झोपेतुन उठुन बाहेर आले असता मला मी माझे घरासमोर पार्क केलेली माझे मालकीची मो/सा होन्डा युनिकार्न एमएच 45 एपी 6796 हि मला दिसुन आली नाही.

त्यानंतर त्यांनी नातेवाईकांकडे मो/सा चा शोध घेतला. ती मिळुन न आल्याने माझी मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याची खात्री झाल्याने पोलीस ठाणेस तक्रार देण्यासाठी गेले होते. मोटारसायकल काळ्या रंगाची असलेली तिचा आर टी ओ नंबर एमएच 45, एपी 6796, तिचा चेसीस नंबर ME4KC401CMA228969, इंजीन नंबर KC40EA0229064 असे वर्णन आहे. कोणाला गाडी सापड्यास करमाळा पोलिस ठाण्यात जाऊन जमा करावी.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE