ताज्या घडामोडी

माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत स्कुल बॅग व वॉटर बॉटल वाटप

करमाळा समाचार

 

माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्याच्याच अनुषंगाने कंदर येथील पदम पंडित प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग व पाणी बॉटल वाटप चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पवार यांनी दिली आहे.

माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक गावागावात वेगवेगळी कार्यक्रम आयोजित जात आहेत.

कंदर येथील पदम पंडित प्रतिष्ठानच्यावतीने अभिमन्यू शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक व माध्यमिक शाळा केम येथे विद्यार्थ्यांसाठी गुरुवारी ३१ रोजी दुपारी एक वाजता मोफत स्कूल बॅग व पाणी बॉटल वाटप चे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस उपनिरीक्षक अभिमान गुटाळ, मंडळ अधिकारी केम मीरा नागटिळक, अजित दादा पवार माध्यमिक विद्यालय केम चे अध्यक्ष मारुती पारखे, विद्यमान सरपंच तथा माजी जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील, प्रहार चे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, चेअरमन सुदर्शन तळेकर, मुख्याध्यापक नितीन जगताप, सहशिक्षक देविदास यादव यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती अण्णासाहेब पंडित पवार यांनी दिली आहे.

ads

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE