सोशल मिडियाच्या माध्यमातून मैत्री, फसवणुक , दुष्कर्म – तिघांना सात दिवसांची पोलिस कोठडी
करमाळा समाचार
सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक साधत तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर मारहाण करून अत्याचार केल्याप्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील तिघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदरची घटना ६ जानेवारी रोजी जेऊर येथील साई लॉज रूम नंबर ३०१ मध्ये घडली आहे. तर दि १० रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणातील तीनही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.

सलीम रहिमसाब सगरी (वय २१), सौरभ दिनेश बनसोडे (वय २०), अर्जुन बाबुराव रणदिवे (वय ३२) सर्व रा. जेवळी ता. लोहारा, जिल्हा उस्मानाबाद असे संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे.

फरार आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवरच रोखला चाकु ; पाच वर्षापासुन हवा होता आरोपी
याबाबत अधिक माहिती अशी की अल्पवयीन मुलगी व सलीम सगरी या दोघांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. त्या माध्यमातून तो तिला भेटू लागला. दि ६ रोजी सकाळी दहाच्या सुमारास सलीम व संबंधित अल्पवयीन मुलगी ही जेऊर येथील बसस्थानकावर भेटले. त्या ठिकाणाहून ते जेऊर येथील साई लॉज याठिकाणी गेले. लॉजवर पोहोचल्यानंतर सलीम याने त्या मुलीसोबत संबंध प्रस्थापित केले. तसेच त्याच्या इतर मित्रांना संबंध प्रस्थापित करण्यासाठी मुलीवर दबाव टाकला गेला. मुलीने त्याला विरोध केला. त्यावेळी तिला मारहाण करण्यात आली.
*चुरशीच्या सामन्यात सोलापूर शहर संघाने नवयुग व्हाँलीबाँल चषकावर मारली बाजी*
https://karmalasamachar.com/solapur-city-team-wins-navyug-volleyball-cup-in-churshi/
त्याठिकाणाहून घरी आल्यानंतर मुलीने सर्व हकीकत आपल्या घरी कळवली. दि १० रोजी त्या मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु मुलीला मोबाईल क्रमांक व त्याच्या नावाशिवाय अधिक माहिती नसल्याने पोलिसांपुढे आरोपींना पकडणे एक प्रकारचे आव्हान होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप, चेतन पाटील, चंद्रकांत ढवळे यांच्या पथकाने उस्मानाबाद पर्यंत जाऊन संबंधितांना राहत्या घरातून २४ तासाच्या आत ताब्यात घेतले.
*कुंभारगाव पंचक्रोशीत कुकडीचे पाणी – शेतकरी समाधानी*
https://karmalasamachar.com/kumbhargaon-five-crooked-poultry-water-farmers-satisfied/
त्यानंतर त्यांना बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर तब्बल (दि१७ पर्यत) सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन जगताप हे करीत आहेत.