करमाळासोलापूर जिल्हा

संजय मामांचे व्हिजन करमाळा ; विविध कामांच्या बाबतील दिलखुलास आ. संजयमामा

करमाळा समाचार -संजय साखरे

 

करमाळा येथील सर्व पत्रकार बांधवांचा आज संजय मामा शिंदे वाहतूक संस्थेच्या वतीने आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी बोलताना करमाळा तालुक्याच्या विकासाचे व्हिजन पत्रकारांसमोर सादर केले.

2019 ला करमाळा तालुक्यातील जनतेने दिलेल्या संधीचे सोने करण्याचे आपले प्रयत्न युद्धपातळीवर चालू आहेत. करमाळा तालुक्यातील विजेचा प्रश्न आपण प्राधान्य क्रमाने सोडवत असून पैसे जनतेचे असले तरी ते पैसे परत शासनाकडून आणून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक असते आणि तो आपण सातत्याने करत आहोत. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर यश येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

*करमाळा नगरपरिषदेसाठी संजयमामांचा पुढचा प्लॅन तयार ; तर आदिनाथ बाबत मोठे वक्तव्य* पत्रकारांच्या सन्मानदिनी विकासकामांच्या बाबत आ. संजयमामा यांचे संपुर्ण भाषण.

जातेगाव टेंभुर्णी रस्ता आणि डिकसळ पुल ही दोन अत्यंत महत्वाची कामे आपण मार्गी लावली आहेत. गेले वर्षभर आपण याचा पाठपुरावा करत होतो .श्रेयासाठी राजकारण करणे ही आपली रीत नसून जातेगाव टेंभुर्णी रस्त्याची ज्या दिवशी वर्कऑर्डर निघाली त्याच दिवशी हँडवर्क निघाले. आपण प्रसिद्धीसाठी काम करत नसून रिझल्ट साठी काम करतो असे त्यांनी सांगितले.

आदिनाथ कारखाना ,कुकडी चे पाणी आणि दहिगाव उपसा सिंचन योजना याबाबतीत यांनी आपले विचार व्यक्त केले .दहिगाव उपसा सिंचन च्या लाईट बिल यासंदर्भात सव्वा कोटी रुपयांचे लाईट बिल इरिगेशन ला भरण्यास उशीर झाला तर मी माझ्या कारखान्याचे पत्र महावितरणला दिले. मात्र या बाबतीत कधीही गाजावाजा केला नाही.

आदिनाथ च्या बाबतीत राजकारण नसून पहिल्या बोर्डाने ठराव करून दिला तरी त्यावर एनसीडीसी चा बोजा होता. एनसीडीसी ने एम एस सी बँकेला स्टे दिला. त्यामुळे प्रक्रिया रखडली. आदिनाथ कारखाना पवार कुटुंबीयांनी घेतला तर त्यांना चालविण्यास सहकार्य करू आणि जर तसे झाले नाही तर पुढील वर्षी आदिनाथ कारखान्याच्या निवडणुका आहेत त्या वेळी आपण जनतेसमोर जाऊ असेही त्यांनी सांगितले.

दहीगाव च्या माध्यमातून परिसराचे नंदनवन झाले असून आणखी काही गावे दहीगाव योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. दहीगाव च्या पाण्याचा आसपासच्या गावाला मोठ्या प्रमाणात लाभ होत असून त्यांच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

कुकडी चा डावा कालवा येडगाव धरणातून सुरू होतो .येडगाव धरणाला डिंभे धरणातून सहा टीएमसी पाणी येते .यासाठी मी आणि रोहित दादा पवार एकत्र काम करत असून डिंभे धरणातून येडगावला 56 किलोमीटर अंतर पार करून पाणी आणया ऐवजी अठरा किलोमीटरचा बोगदा तयार करून पाणी आणता येईल यावर चर्चा असून या प्रस्तावाला लवकरच तत्त्वतः मान्यता मिळण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले.

करमाळा शहरातील रस्त्याच्या बाबतीत पुढील पंचवीस वर्षाचे प्लॅनिंग तयार असून यासाठी लवकरच काम सुरू करायचे आहे. 2024 च्या अगोदर 30 ते 40 कोटी रुपयांचा निधी करमाळा शहरातील रस्त्याच्या संपूर्ण डांबरीकरणासाठी लागत असून त्यासाठीचा संपूर्ण आराखडा तयार आहे .असेही त्यांनी सांगितले.
विकासकामात राजकारण नसून विकास कामात आपण कधीही आडकाठी आणत नाही .आडकाठी आणणारा माणूस राजकारणात यशस्वी होत नाही असेही त्यांनी शेवटी सांगितले . यावेळी करमाळा शहरातील व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE