कुंभारगाव पंचक्रोशीत कुकडीचे पाणी – शेतकरी समाधानी

करमाळा समाचार -संजय साखरे


गेली कित्येक वर्षे पाण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या व कुकडी धरणाच्या शेवटी असणारे कुंभारगाव व घरतवाडी परिसरात या वर्षी फुल दाबाने पाणी आल्याने कुंभारगाव पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण झाले आहे. त्यासाठी गावातील तरुण मंडळी तसेच कुकडी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. आर. के जगताप साहेब, उप अभियंता श्री. आर. एम विभुते साहेब व श्री डी. बी लष्करे साहेब यांच्या प्रयत्नातून पाणी आल्याने कुंभारगाव व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.

आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नामुळे व त्यांनी कुकडी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिल्यामुळे सुव्यवस्थित पाणी वितरण झाले आहे. तिकडे शेवटी कर्जत तालुक्यातील करपडी गावात व शिंपोरा गावात सुद्धा पाणी पोहोचले ही अशी गोष्ट पहिल्याच वेळेस घडल्यामुळे सर्व परिसरात आनंदाचे वातावरण झाले. व त्यांच्या आशा उंचावल्या आहेत. यामुळे रब्बी पिकांना जीवदान मिळाले असून उन्हाळ्यात सुद्धा शेतकऱ्यांना पिके घेता येणे शक्‍य होणार आहे .

यासाठी करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती श्री बाळासाहेब पाटील, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती श्री जालिंदर शेठ पानसरे ,घरत वाडी चे माजी पोलीस पाटील श्री शामराव लोटके, सामाजिक कार्यकर्ते श्री बाळनाथ श्रीधर पवार ,रमेश गोकुळ पानसरे, दादा ज्ञानदेव पानसरे श्री बाळासाहेब कल्याणराव आढाव श्री भिकाजी दत्तू भोसले या सर्वांनी सर्व कुकडी अधिकारी वर्गाचे आभार मानले आहेत.

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!