दिग्विजय बागल यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप
करमाळा समाचार
बागल गटाचे नेते व मकाईचे चेअरमन दिग्विजय (भैय्या)बागल यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले. पोथरे तालुका करमाळा येथील ग्रामपंचायत सदस्य शांतीलाल झिंजाडे सफरचंद, केळी आदी फळांचे रुग्णांना वाटप केले.

यावेळी डॉक्टर अमोल डुकरे, डॉक्टर राहुल कोळेकर, डॉक्टर महेश भोसले, सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे, पत्रकार दिनेश मडके, परिचारिका विद्या ढाकणे, छाया शिंदे, रेश्मा बनसोडे, रमा सिमेंदर, श्रीमती मांडवे, कैलास सुद्रीक, सुहास आगलावे, अजित शिंदे, गणेश कांबळे, अनिल झिंजाडे, सुधीर झिंजाडे, दिपक शिंदे, महेश झिंजाडे, अविनाश झिंजाडे आदी उपस्थित होते.

यावेळी शांतीलाल झिंजाडे म्हणाले की, बागल हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हार फिटे यावर खर्च न करता रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून दिग्विजय बागल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.