शाळेसाठी अत्याधुनिक वाय-फाय कनेक्टेड कलर प्रिंटर कम स्कॅनर भेट
करमाळा समाचार

बदलत्या काळाची कास धरत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोकरी कात टाकत आहे. याच बदलाचा स्वीकार करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोकारी येथे ढोकरी गावचे माजी सरपंच व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष. मा. श्री. हिरा चौगुले आणि उपाध्यक्ष श्री. मल्हारी मांढरे यांनी मिळून शाळेसाठी अत्याधुनिक वाय-फाय कनेक्टेड कलर प्रिंटर कम स्कॅनर भेट दिला आहे.

यामुळे नाविन्यपूर्ण आणि विविध अंगी अभ्यास करण्यासाठी मुलांना संधी मिळणार आहे. यावेळी शालेय शिक्षण समितीचे सदस्य, माजी सरपंच. श्री. विलास वळसे. श्री. तुळशीराम (पप्पू) खरात. श्री. जगन्नाथ सांगवे. व सहशिक्षिका सौ. सुवर्णा जाधव (मॅडम) तसेच ढोकरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे प्रयोगशील मुख्याध्यापक. श्री. विवेक पात्रुडकर (सर) उपस्थित होते. या अनोख्या भेटीचे मुलांकडून आणि समस्त पालक वर्गातून तसेच समस्त ढोकरी ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे.

