करमाळाराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

मनुवादी भिडेच्या डोक्यात किडे ; आक्षेपार्ह वक्तव्यावरुन कॉग्रेस आक्रमक

करमाळा समाचार

राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा फुले यांच्या बाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करत भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करमाळा तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप व युथ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी शिंदे यांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी बहुसंख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

याबाबत करमाळा पोलीस ठाणे तसेच तहसील कार्यालय करमाळा येथे सदरचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये वादग्रस्त वक्तव्यासाठी आणि अजब व तर्कट स्वभावासाठी कुप्रसिद्ध असलेले शिवप्रतिष्ठानचे हिंदुस्तान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, मनुवादी भिडेच्या डोक्यात किडे पडले आहेत. केंद्र सरकारला सध्या मणिपूर व इतर विषयांवरुन विरोधकांनी रडार वर घेतले आहे. या विषयांवरुन लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भिडे यांचा प्रयत्न सुरु आहे.

त्यामुळे मनुवादी विचारांच्या भिडेकडुन सदरची वक्तव्य केल्याचे दिसून येत आहेत. पण ते करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच देशातील जनतेचा आदरस्थान असलेल्या महापुरुषांच्या नावांचा वापर करणे चुकीचे आहे. त्यांच्याबाबत त्यांनी केलेली वक्तव्य हे निंदनीय असून अशा प्रवृत्तीचा वेळीच थांबवणे गरजेचे आहे अशी मागणी तालुकाध्यक्ष प्रताप जगताप व संभाजी शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे. भिडे यांच्यावर कारवाई करीत असताना कलम १५३ अंतर्गत अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

यावेळी सदर निवेदनावर शहराध्यक्ष युवक सुजय जगताप, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दस्तगीर पठाण, किसान सेलचे तालुका अध्यक्ष दादासाहेब कुदळे, तालुका उपाध्यक्ष छगन मोहोळकर, ओबीसी तालुकाध्यक्ष गफुर शेख, उपाध्यक्ष आनंद झोळ, बाबुराव एकाड, संभाजी शिंदे, नितीन चिंचकर, गफूर शेख, भगवान डोंबाळे, विष्णू वाघमोडे, मधुकर टापरे, दीपक ननवरे, नितीन चोपडे, रमजान मुलाणी, वसंत भिसे, निकेश चव्हाण आदींच्या सह्या आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE