जुळ्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त गाडे दांपत्याकडुन पाण्याची टाकी भेट
समाचार टीम
करमाळा येथील मुलांची शाळा क्रमांक एक या ठिकाणी शिकत असलेल्या यश दादा गाडे व राज दादा गाडे या दोन्ही मुलांच्या वाढदिवसाचा निमित्त प्रसिद्ध फोटोग्राफर दादा गाडे यांनी शाळेला पाण्याची टाकी भेट दिली आहे. यावेळी नगरसेवक प्रविण जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुलांचे वाढदिवस साजरे करत असताना पालक त्यांची हौसमौज पुरी करत घरी अवास्तव खर्च करत असतात. पण ज्या शाळेत मोफत शिक्षण घेतात त्या शाळेत मात्र खर्च करण्यासाठी टाळाटाळ करताना दिसून येतात. पण यालाच अपवाद असे काम हे गाडे कुटुंबीयांनी केले आहे.

आपल्या पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या राज आणि यश या दोघांच्या वाढदिवसानिमित्त गाडे यांनी शाळेला एक पाण्याची टाकी भेट दिली आहे. त्यामुळे शाळेच्या प्रशासनाच्या वतीने गाडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तर इतरांनीही असेच अनुकरण करावे असे आवाहन नगरसेवक प्रविण जाधव यांनी केले आहे.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा माने, अश्विनी ठाकरे, सुनिता शितोळे, सुषमा केवडकर, आशा अभ्यंगराव, मंगल गलांडे, धनश्री उपळेकर, अर्चना ताटे, वैशाली जगताप, भैलुमे मॅडम, कांबळे मॅडम, सुरेश कोळी, लालासाहेब शेरे आदि शिक्षक व गाडे दाम्पत्य उपस्थित होते.