करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सिनेमा रसिकांची हौस आता करमाळ्यात पुरी होणार ; थोड्याच वेळात मंजुळे यांच्या हस्ते उद्घाटन

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील चित्रपट गृह बऱ्याच दिवसापासून बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात नवीन चित्रपट पाहणे शक्य होत नव्हते. त्यामुळे आसपासच्या गावी जाऊन सिनेमे पहावे लागत होते. पण आता करमाळा येथे नव्याने सुरू होत असलेल्या छोटू महाराज या सिनेमागृहामुळे लोकांची ती अडचण दुर होणार आहे. याचे उद्घाटन थोड्याच वेळात करमाळा येथे नागरिक चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे व मंगेश बदल यांच्या हस्ते होत आहे.

अहमदनगर टेंभुर्णी रस्त्यावर करमाळा शहरालगत राजयोग हॉटेलच्या जवळ सदरचे थिएटर होत असल्यामुळे आता सिनेमा पाहण्यासाठी जास्त लांब जावे लागणार नाही. सुसज्ज असे थेटर असून या ठिकाणी एका वेळी 100 जणांची बसण्याची व्यवस्था होणार आहे. एक वेगळ्या शैलीचे हे थेटर करमाळ्यात होत असल्याने सिनेमा रसिकांची यात सिनेमा पाहण्याची हाऊस पूर्ण होणार आहे.

करमाळ्यातील प्रसिद्ध उद्योजक प्रमोद चांदगुडे यांनी हे नियोजन केले आहे. थोड्या वेळात या थिएटरचे उद्घाटन होत आहे. तालुक्यातील सर्व प्रमुख पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. यावेळी माजी आमदार नारायण पाटील , विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, शिवसेनेचे प्रवीण कटारिया, नगरसेवक अल्ताफ तांबोळी, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे ओएसडी मंगेश चिवटे, महेश चिवटे, कन्हैयालाल देवी, महादेव फंड, टायगर गृपचे तानाजी जाधव, राजेंद्र चिवटे  यांच्यासह मान्यवर येत आहेत. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन चोपडे करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE