देव तारी त्याला कोण मारी ; करमाळा तालुक्यातील अपघातातील जखमी मुलाला सोलापूरच्या डॉक्टरांनी दिले जीवदान
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील देवीचामाळ येथील एका कारखान्यात 14 वर्षाच्या मुलाचा कन्वेयर बेल्ट मध्ये अडकून अपघात झाला. मुलाच्या छातीच्या डावा भाग पूर्ण कापला गेला होता. छातीत कापली गेलेले हे दृश्य हृदयद्रावक होते. रुग्णाची फुपुस बंद अवस्थेत उघडे पडले होते अशा परिस्थितीत त्यास सोलापूर येथे दाखल केले कठीण शस्त्रक्रिया करुन त्या मुलास वाचवण्यात आले त्यामुळेच देव तारी त्याला कोण मारी या म्हणी चा देव रुपी डॉक्टरांच्या रुपाने प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला.

हृदयाचे ठोके पडत असताना स्पष्ट दिसत होते. मुलाच्या वाचण्याची शक्यता कोणत्याही प्रकारे वाटत नव्हती अशा परिस्थितीत करण पवार या देवीचा माळ येथील 14 वर्षीय मुलाला सोलापूर येथे डॉक्टर विजय अंधारे यांच्याकडे पाठवण्यात आले. अंधारे यांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णाला थेट हृदयशस्त्रक्रिया विभागामध्ये हलवले रुग्ण ज्यावेळी रुग्णालयात पोहोचला होता बेशुद्धावस्थेत होता. तेव्हा रुग्णाचे फुप्फुस बंद पडले होते.

करण पवार याचे वडील ज्या कारखान्यात काम करत होते. त्या ठिकाणी तो गेला होता. चुकून कन्व्हेअर बेल्ट मध्ये अडकून अपघात झाला. डाव्या बाजूची छाती फाटली होती. स्नायू व हाडी तुटली होती. हृदय बाहेरुन दिसत होते. श्वास घेता येत नव्हता. सी एन एस मध्ये प्राथमिक उपचार करून तोंडात नळी टाकून मार्कडेय रुग्णालयात आणण्यात आले. त्याला डायरेक्ट हृदयशस्त्रक्रिया विभागामध्ये दाखल करण्यात आले. तपासाअंती फुफुस बंद होते.
रक्तस्त्राव झाला होता. मोठी हाडे चुकली होती. ती नीट केली. छातीचा पिंजरा तयार करून रचनेनुसार पडद्यावर पडदे जोडण्यात आली. तो श्वास घेतो की नाही याचे टेंशन होते. एका तासानंतर तो श्वास घेऊ लागला. तोंडातील नळी काढून टाकली तेव्हा त्याला आयसीयूमध्ये सामान्य वार्डात घेण्यात आले. रविवारी त्याचा डिस्चार्ज दिवस आहे.