गणपती मंडळांना दिलासादायक बातमी ; आता परवानगीचा ताप कमी आणी स्पीकरच्या वेळेत बदल
समाचार टीम –
राज्यात गणेश मंडळांना घ्याव्या लागणाऱ्या विविध परवानग्या आता पाच वर्षात एकदाच घ्याव्या लागतील. त्या एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात येत आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. पोलीस आयुक्तालयात आयोजित गणेशोत्सव पदाधिकारी बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

ते म्हणाले महापालिकेचे मंडप शुल्क ही माफ करण्यात आले आहे. मंडप शुल्क माफ करणे, वीज मीटर परवानगी देणे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळांना सहकार्य करावे. गणेश मंडळे तसेच भाविकांना जल्लोष करण्यासाठी पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करताना नियमांचे पालन करावे.

पोलीस व मंडळांना आवाहन…
विसर्जन मिरवणुकीत दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजले नंतर मंडळांना पारंपारिक वाद्य वाजवून द्यावी पोलिसांनी कारवाई करू नये. उत्सवात नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी पोलिसांनी तर वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी मंडळांनी घ्यावी.