करमाळासोलापूर जिल्हा

माजी आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीरास कुगांव व परिसरातुन चांगला प्रतिसाद

समाचार टीम


आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नारायण आबा पाटील मित्र मंडळ आणि युवा नेते सागर पोरे यांच्या आवाहनाला युवकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामध्ये चिखलठाण १.२, केडगाव, दहिगाव ,जेऊर व कुगाव येथील महिलांनी सहभाग नोंदवला. या शिबिराचे उद्घाटन युवा नेते पृथ्वीराज पाटील यांनी केले.

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती दत्ता सरडे, उपसरपंच मन्सूर सय्यद, माजी सरपंच महादेव पोरे , ग्रामपंचायत सदस्य अमोल अवघडे , अशोक गाडे , मारुती गावडे, तुकाराम हवालदार शिवाजी वायसे , पांडुरंग काळे, बाबा सय्यद आदी उपस्थित होते. या शिबिरात ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन उपसरपंच मन्सूर सय्यद यांनी आभार मानले. या शिबिरासाठी सोलापूरच्या सिद्धेश्वर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले .

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE