करमाळासोलापूर जिल्हा

ग्रामपंचायत रणधुमाळी महाविकास आघातील धुसफुस चव्हाट्यावर आणणार ; निवडणुकांचा संपुर्ण कार्यक्रम जाहीर

करमाळा समाचार 

तालुक्यातील 51 ग्रामपंचायती या काळात मुदत संपूनही निवडणुका जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 15 डिसेंबर रोजी सदर निवडणुकीचे नोटीस जाहीर करण्यात येणार आहे. तर नाम निर्देशन पत्र मागण्याचा व सादर करण्याचा दिनांक 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत असणार आहे . तर 15 जानेवारी रोजी मतदान घेतले जाईल.

तालुक्यात प्रमुख तीन पक्ष असतानाही तालुक्याचे राजकारण हे गटावर अवलंबून आहे. पण मागील निवडून निवडणुकीपासून पक्षांच्या राजकारणाला करमाळा तालुक्यात किंमत निर्माण झाली आहे. सध्या राष्ट्रवादी हा तालुक्यातील प्रबळ दावेदार पक्ष असला तरीही शिवसेनेमध्ये गटातटाचे राजकारण बघायला मिळते. महाविकासआघाडी म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी जरी एकत्र असले तरी या निवडणुकांमध्ये पक्षाच्या बॅनरखाली निवडणुका होतील की गटातटाच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातील. याकडे पुढील येणाऱ्या काळात सर्वांचेच लक्ष असेल तर महाआघाडीच्या माध्यमातून निवडणुका बघता गटाच्या माध्यमातून निवडणुका लढल्यास आजही करमाळा तालुक्यात पक्षाला अधिक महत्त्व दिले जात नाही असे दिसून येईल.

त्यामुळे पक्ष वाढीसाठी निवडणुका या पक्षाच्या बॅनरखाली लढल्यास पक्ष हिताचे ठरेल. तर यामुळे तालुक्यातील महाविकासआघाडी मधील गटबाजी चव्हाट्यावर येईल. म्हणून नेते मंडळी काय भुमीका घेतील याकडे लक्ष राहिल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE