पूर्ण दाबाने 33 KV वीजपुरवठ्यासाठी युवासेनेचे सोमवारी महावितरण विरोधात आमरण उपोषण
करमाळा समाचार

कोळगाव 33/11 KV सबस्टेशनला गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्ण दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या युवासेनेने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले अस सोमवार दि. 12 मे 2026 पासून जेऊर महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे युवासेना तालुकाप्रमुख शंभुराजे फरतडे यांनी जेऊर महावितरण कार्यालयाला दिला आहे.

33 KV सबस्टेशन ला फक्त 22 KV वीजपुरवठा होत आहे. लो व्होल्टेजमुळे शेतकऱ्यांच्या मोटारी जळत आहेत, शेती पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊनही महावितरण दुर्लक्ष करत असल्याचे फरतडे यांचे म्हणणे आहे.
खासदारांच्या आढावा_बैठकीत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर स्पेअर बे नादुरुस्त असल्याने लोड घेत नाही आम्ही स्पेअर बे ची मागणी केली असून लवकर पुर्ण दाबाने वीज देऊ असे आश्वासन जेऊर महावितरण कार्यकारी उप अभियंत्यांनी दिले होते मात्र आढावा पाच दिवस झाले तरी उपाययोजना झाली नसल्याने शनिवार दि ८ मे रोजी इशारा दिला असून सोमवार पर्यंत दुरस्ती न झाल्यास जेऊर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे शंभुराजे फरतडे यांनी सांगतीले आहे.

निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, महावितरण कार्यकारी अभियंता,तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांना दिल्या आहेत.

