करमाळा पोलिसांची मोठी कामगिरी ; मोठे मासे पोलिसांच्या गळाला
करमाळा समाचार
करमाळा पोलिसांनी मोठी कामगिरी करून दाखवली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पोलिसांना पाहिजे असलेले आरोपींना पकडण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. तांब्याच्या तारा चोरणारे सदरचे हे रॅकेट करमाळा पोलिसांच्या गळाला लागले आहे. थोड्याच वेळात या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती करमाळा पोलीस देणार आहेत. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस यांनी केली आहे.

तालुक्यातील विविध भागात मोटार रिवायडींग चे दुकाने फोडून तसेच वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या करून तांब्याच्या तारा चोरून नेल्याचे प्रकरण घडले होते. त्यानंतर करमाळा पोलिसांनी वेगात तपास करीत सदरचे गुन्हेगार शोधण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जिल्ह्याबाहेरील संशयित ताब्यात आले आहेत. तर त्यांच्याकडून मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे अशा पद्धतीचे गुन्हे फक्त तालुक्यात नसून विविध जिल्ह्यात त्यांनी केले होते हेही निष्पन्न झाले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलिसांना पाहिजे असलेले आरोपी करमाळा पोलिसांना सापडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यासंदर्भात तिघांना ताब्यात घेतले आहे. तर आणखी काहींचा शोध सुरू आहे. तसेच या सर्वांकडून मुद्देमाल ही ताब्यात घेण्यात आला आहे. तालुक्यात घडलेल्या गुन्ह्यांसह इतर जिल्ह्यातीलही गुन्ह्यांची माहिती घेतली जात आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी करमाळा पोलीस ठाणे येथे थोड्याच वेळात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.