करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

धन्यवाद !! पोलिस दादा तुमच्या मुळे हे शक्य झाले ; अडचणीतल्या दांपत्याने मानले पोलिस शिपाई पवारांचे आभार

करमाळा समाचार

करमाळा पोलिसांची गाडी ही शासकीय कामासाठी बाहेरगावी असताना अति तातडीने 112 वर कॉल आल्यानंतर तात्काळ मदतीसाठी गेलेल्या कॉन्स्टेबल आनंद पवार यांच्याकडून अडचणीत असलेल्या दांपत्याला अनमोल असे सहकार्य झाल्याचे दिसून आले आहे. नुकतंच नगर सोलापूर महामार्गावर करमाळा ते मागे रस्त्यावर गाडीचा घोटाळा झाला व दांपत्याला पोलिसांची गरज भासली. विशेष म्हणजे त्या ठिकाणी कसलाही अपघात झालेला नसताना केवळ 112 ला संपर्क साधल्यामुळे कॉन्स्टेबल पवार यांनी मदतीला धावून आल्याने दांपत्याने पोलिसांचे आभार मानले.

एम पी एस ची परीक्षा देण्यासाठी एक दांपत्य नगरहुन सोलापूरला जात असताना अचानक मांगी ते करमाळा दरम्यान टोलनाक्याच्या पुढे गाडीचा घोटाळा झाला. रात्रीचे चार ते पाच वाजले काही सुचेना परिक्षेला जाणं गरजेचं होत. त्यातुनही कोणाची मदत मागायची सुचेना त्यानंतर त्यांनी धाडस दाखवत 112 पोलीस मदतीसाठी कॉल केला. तो कॉल कॉन्स्टेबल आनंद पवार यांच्याकडे गेला. त्यांनी त्यावेळेस त्यांना विचारलं नेमकं काय झालं. त्यानी सांगितले सोलापूरला एम पी एस परीक्षा देण्यासाठी माझी पत्नी मिनाज कुरेशी हीला वेळेवर जावं लागणार आहे. तरच माझ्या पत्नीला परीक्षा देता येणार आहे.

यावेळेस हे ऐकून आनंद पवार यांना काय सूचेना शासकीय गाडी बंदोबस्तासाठी गेली होती. पवार यांनी स्वतःची स्वीफ्ट गाडी घेतली आणि मागींच्या दिशेने निघाले. त्यावेळेस त्या मुलीने सांगितलं तुम्ही देवासारखे धावून आलात मी जर आज वेळेवर गेले नसते तर मला परीक्षा देता आली नसती अशा वेळेस पवार यांनी करमाळा मध्ये आल्यावर त्यांना तिथे सोडले नाही तर पहाटेची रेल्वे आहे का ? एसटी बस आहे का ? ती वेळेवर पोहोचेल का ? याची सर्व चौकशी केल्यानंतर त्यांनी लवकर कसं पोहचता येईल यासाठी पहाटेची पेपरची गाडी त्या गाडीमध्ये त्या दोघा नवरा बायकोला बसून सोलापूरला पाठवले.

त्यांनी परीक्षाही दिली त्यांनी कॉन्स्टेबल आनंद पवार यांचे कौतुक करून सांगितलं मी सिलेक्ट झाल्यानंतर पहिला तुम्हाला फोन असेल ते नगर येथील एका मुस्लिम समाजातील मिनाज अविद कुरेशी असे नाव आहे. त्याच्याशी फोनद्वारे सर्पंक केल्यावर त्यांनी आनंद पवार यांचे आभार मानून झालेली हकिकत सांगितली. मी सोलापूरला नऊ वाजता वेळेत पोहोचले मला करमाळा येथील पोलिस दादानी सहकार्य केल्यामुळे सुखरूप वेळेवर पोहचले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE