“आझादी का अमृतमहोत्सव” या कार्यक्रमाअंतर्गत मोफत सुविधाबाबत मार्गदर्शन
करमाळा :
राज्य विधी सेवा प्राधिकरण मार्फत सुरू असलेल्या “आझादी का अमृतमहोत्सव” या कार्यक्रमाअंतर्गत करमाळा तालुका विधी सेवा समितीच्यावतीने आज (ता.4) करमाळा न्यायालयातील मुख्य न्यायाधीश प्रशांत घोडके व सहदिवाणी न्यायाधीश आर ए शिवरात्री यांचे मार्गदर्शनाखाली राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या मोफत सुविधाबाबत करमाळा नगरपरिषदेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी नगरपरिषदेचे श्री.देशमुख साहेब, करमाळा वकील संघांचे सदस्य ऍड. योगेश शिंपी, ऍड. एम.डी.कांबळे, ऍड. ए. एच.पठाण, विधी सेवा समिती सदस्य आकाश मंगवडे, न्यायालयीन कर्मचारी एस.बी. सरक हे उपस्थित होते. यावेळी श्री. शिंपी, श्री. कांबळे व श्री. पठाण यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विधी सेवा समितीचे व न्यायालयीन कर्मचारी रामेश्वर खराडे यांनी केले.