E-Paper

राजुरीत उद्यापासून हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

करमाळा समाचार – संजय साखरे


राजुरी तालुका करमाळा येथे उद्यापासून प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशन व राजमुद्रा ग्रुप यांच्या वतीने भव्य हाप पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचा परिसरातील क्रीडा स्पर्धकांनी लाभ घ्यावा असे आव्हान संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशन यांच्या वतीने या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे 22 222 रुपयाचे बक्षीस ठेवण्यात आले असून द्वितीय बक्षीस 1555 5,तृतीय बक्षीस 11111 तर चतुर्थ बक्षीस 7777रुपये ठेवण्यात आलेले आहे.

सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन उद्या सकाळी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर व उपाध्यक्ष राणा दादा सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते होणार आहे असून प्रथम क्रमांक येणाऱ्या संघास 22222रुपये व राजेश्वर चषक देण्यात येणार आहे. राजुरी येथील श्री राजेश्वर विद्यालयाच्या मैदानात या क्रीडा स्पर्धा भरणार असून क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रिकेटचा आनंद घ्यावा असे आव्हान संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE