हंकारेंचे व्याख्यान .. मुली आणि बाबांच्या डोळ्यातही तरळले अश्रू
करमाळा समाचार
तुम्ही लाखो रुपये कमवले आणि ते शिर्डी किंवा बालाजीला जाऊन वाहिले तरीही तो शिर्डीचा देव किंवा बालाजी चा देव तुम्हाला तुमचा बाप परत देणार नाही त्यामुळे आहे त्यावेळेसच आपल्या बापाची किंमत करा आणि त्याच बापाची मान खाली जाऊ देऊ नका अशी भावनिक साद प्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे यांनी दिली. तर देताना बाप आणि मुलीच्या नात्यावर केलेल्या भाषणाने मुलीसह बापही गळ्यात पडुन रडु लागले. करमाळ्यात आयोजीत ग्लोबल इंस्टीट्यूट च्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते वसंत हंकारे (vasant_hankare) हे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक उदाहरणे देऊन श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणले. त्याचबरोबर यावेळी त्यांनी सांगितले की बापच तुझा देव आणि आई तुझी देवी आणि शाळा आहे तुझे मंदिर असे उद्गार देऊन लोकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यात आई-बाबा बद्दल जागृती निर्माण केली.

महेश निकत यांच्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वर्धापन दिनानिमित्त वसंत हंकारे यांचे करमाळा येथील विकी मंगल कार्यालय येथे ‘न समजलेले आई- बाप’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षाचा बक्षीस वितरण सोहळाही झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे माण येथील अभयसिह जगताप, टायगर ग्रुपचे तानाजी जाधव, माजी प्राचार्य जयप्रकाश बिले, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, डॉ. रोहन पाटील, डॉ. आशुतोष कापले, आरपीआयचे युवक अध्यक्ष यशपाल कांबळे, मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप, प्रा. नागेश माने, प्रकाश लावंड, माजी नगरसेवक अतुल फंड, विनय ननवरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, प्रा. लक्ष्मण राख उपस्थित होते. प्रा नंदकिशोर वलटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यांचा झाला गौरव ..
जयदीप एकाड, चिखलठाण येथील अकताब सय्यद, मांगी येथील हर्षदा जमदाडे, करमाळा येथील गौरी गाडेकर, जेऊर येथील शंभुराजे घोरपडे, सिद्धांत धोकाटे, कुंभेज येथील साक्षी मिसाळ, शौर्य शिंदे, तेजस्विनी काऊले, अजिंक्य शिंदे, सुरज शिंदे आदींना पारितोषक देऊन गौरवण्यात आले.