करमाळासामाजिकसोलापूर जिल्हासोलापूर शहर

गुळसडी येथुन हर घर तिरंगा अभियानाची सुरुवात

करमाळा समाचार

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने दत्तक गाव गुळसडी तालुका करमाळा या ठिकाणी आजादी का अमृत महोत्सव या अभियानांतर्गत १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या हर घर तिरंगा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा .प्रमोद शेटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून राष्ट्रप्रेम ,राष्ट्रीय एकात्मता ,सार्वभौमत्व या गोष्टी सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी व आपले देशप्रेम कायम जागृत ठेवण्यासाठी आपण या अभियानामध्ये सहभागी व्हावे असे समस्त ग्रामस्थांना आवाहन केले यावेळी महाविद्यालयाच्या वतीने गुडसळी येथील ग्रामस्थांना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना ध्वजाचे वाटप करण्यात आले व ध्वजाचे पावित्र ठेवण्या बाबत विनंती करण्यात आली.

सदर प्रसंगी गुळसडी गावचे सरपंच श्री.प्रमोद भंडारे ग्रामसेवक श्री. बडे सर्व ग्रामपंचायत सदस्य, कृषी सहाय्यक श्री. खाडे व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमास प्रा कृष्णा कांबळे,प्रा.सुधीर मुळीक प्रा.अतुल लकडे.यांनी श्रम घेतले.कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व महाविद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. नितीन तळपाडे यांनी मानले.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE