करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

रानभाजी महोत्सव व पौष्टिक तृणधान्य खाद्यपदार्थ जत्रा चे आयोजन

प्रतिनिधी | करमाळा


महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) करमाळा यांचे वतीने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने दि. ९ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये रानभाजी महोत्सव राबविण्यात येत आहे. सदरील रानभाजी महोत्सव राबविण्यासाठी दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता पंचायत समिती सभागृह करमाळा येथे तालुक्यामध्ये नैसर्गिकरीत्या पिकणाऱ्या व कुठलेही रासायनिक औषधे न वापरलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल लावण्यात येणार आहेत.

तसेच चालू वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे त्यानिमिताने या महोत्सवाबरोबरच पौष्टिक तृणधान्य खाद्यपदार्थ जत्रा आयोजीत करण्यात आली आहे. या रानभाजी महोत्सवामध्ये तालुक्यामध्ये पिकणाऱ्या रानभाज्या उदा. कडवंची, चिघळ, तांदुळसा, अळू, काटेमाठ, शेवगा, पाथरी, हादगा, भुईआवळा, सराटे, आघाडा, टाकळा, केना, कुरडू इत्यादी नैसर्गिक पिकणाऱ्या व फक्त पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. तसेच पौष्टिक तृणधान्यांपासून तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ ही प्रदर्शनामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधव, महिला शेतकरी गट, बचत गटाच्या महिला यांनी सदरील रानभाजी महोत्सव व पौष्टिक तृणधान्य खाद्यपदार्थ जत्रा यामध्ये सहभागी होऊन आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करावयाची आहे. तसेच करमाळा शहरातील व तालुक्यातील नागरीकांनी या रानभाजी महोत्सवास भेट देऊन प्रदर्शन स्थळी विक्रीस उपलब्ध असलेल्या रानभाज्यांची खरेदी करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी करमाळा संजय वाकडे यांनी केले आहे. सदरील रानभाजी महोत्सवामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अजयकुमार बागल – ९४२३६०१५९६ व सत्यम झिंजाडे – ९४२३९८३७९८ यांचेकडे दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी पर्यंत संपर्क साधावा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE