करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांची आरोग्य तपासणी

करमाळा समाचार

देशाचा स्वातंत्र्यदिन, अमृत महोत्सव व रक्षाबंधन चे औचित्य साधुन करमाळा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ. गजानन गुंजकर, स्त्रीरोग तज्ञ डॉ. बंडगर, वरिष्ठ परिचारिका ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी करण्यात आली.

एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सी.डी.पी.ओ. वर्षा पाटील, सुपरवायझर सारीका सनगर यांच्या उपस्थित दहा प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. याकामी परिचारिका छाया शिंदे, परिचारिका ए.एम.पठाण, आरोग्य सेविका ओव्हळ, परिचारिका आर.आर. संमिदर, रक्त तपासणी विभागाचे अनिकेत कोतकर, बरगे यांचे सहकार्य लाभले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वरिष्ठ डाॅक्टर, परिचारिका, आरोग्यसेविका, सर्व स्टाॅफ चे आभार अंगणवाडी सेविका कदीरा बेग यांनी मानले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE