कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम
वाशिंबे प्रतिनिधी (सुयोग झोळ )
कोरोना संसर्गजन्य रोगाच्या तिसऱ्या लाटेच्या पाश्वभूमीवर वाशिंबे ता. करमाळा येथील आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावातील ऊस तोडणी करणार्यां मजूरांचे लसीकरण ऊसाच्या फडात जाऊन करण्यात आले. अनेक मजूरांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज होते. याबाबत आरोग्य कर्मचारी यांनी माहिती दिली.

तर कामाच्या वेळेमूळे अनेक मजूरांना लसीकरण केंद्रापर्यंत जाता येत नाही. परंतु वाशिंबे आरोग्य उपकेंद्रातील डाॅक्टर, परिचारिका,आरोग्य सेवक यांनी राबवलेल्या ऊपक्रमामूळे लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मजूरांना लाभ मिळाला.

तरी सर्व ऊसतोडणी मालकांनी आरोग्य विभागाशी संपर्क करून मजूरांचे लसीकरण करून घ्यावे असेआवाहन आरोग्य अधिकारी डॉ.डाईफळे यांनी केले आहे.