करमाळाक्राईमसोलापूर जिल्हा

आपल्या घरात चोरी झालीय पंधरा दिवसांनी झाले उघडकीस ; अतिविश्वास पडला महागात

करमाळा समाचार

घरकामासाठी ठेवलेल्या महिलेकडुन घरातील दागिन्यांवर डल्ला मारण्याचा प्रकार केम ता. करमाळा येथे घडला आहे. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित महिला ही दि १२ ते १८ डिसेंबर दरम्यान घडला आहे. तर सदरची तीन लाख ४३ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. सर्व परिवार गावाला जाण्यासाठी निघाल्यावर चोरी झाल्याचे दि ६ जानेवारी रोजी उघडकीस आले आहे. शालन अडगळे रा. रोपळे ता. माढा असे संशयीत महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी निशा शिवाजी तळेकर वय ४२, रा.केम ता.करमाळा यांनी फिर्याद दिली आहे.

शेतात काम करण्यासाठी काही महिलांना घेऊन एक वाहन केम येथे येत असत वाहनाचे मालक दत्तात्रय दळवी हे बारा महिला मजुरांना कामासाठी आणत असत त्यावेळी तळेकर यांनी दळवी यांच्याकडे घरातील कामासाठी एक महिला कर्मचारी पाहिजे असल्याचे त्यांना सांगितले त्यावर शेतात मजुरीसाठी येत असलेल्या महिलांपैकी एक शालन आडगळे या घर कामासाठी येऊ शकतात असे त्यावेळी त्यांनी सांगितल्यावर आडगळे यांना दिनांक बारा पासून घर कामाला सुरुवात केली

दि १८ रोजी सायंकाळी ४ वा. चे सुमारास शालन आडगळे हिस घरातील लोखंडी कपाट सफाई करणेस सांगितले होते. त्यावेळी कपाटातील रोख ५०००० रू. व सोने व डायमंडने बनविलेले मंगळसूत्र, कानातील रिंगा, टायटन कंपनीचे मनगटी घडयाळ असे एकुण तीन लाख ४३ हजाराचा मुद्देमाल लहान पर्समध्ये एका पिशवीत कपाटावर ठेवले होते. ते शालन आडगळे हिने पाहीले होते, कपाट साफसफाई झाल्यानंतर पिशवीतील साहीत्य कपाटात ठेवायचे सांगितले होते. साफसफाई झाल्यावर पिशवी ठेवली पण त्यातील दागिने ठेवले होते का नव्हते पाहिले नव्हते.

तेव्हापासुन आडगळे यांनी कामाला येण्याचे टाळु लागली. देवाला जाण्यासाठी दि १९ रोजी पिशवी तपासणी केली तर त्यात दागिणे व रोख रक्कम मिळुन आली नाही. त्यावर आडगळे हिला विचारले तर उत्तर संशयास्पद देऊ लागली त्यामुळे तिच्यावरील संशय बळावला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE