हिवरवाडीची रणरागिणी आक्रमक ; रस्त्यासाठी विद्यार्थी उतरले मैदानात
करमाळा समाचार
हिवरवाडी रस्त्याची दुरावस्था झालेली असताना त्या रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. म्हणून आज जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांना घेतले होते. यावेळी तात्पुरती टोलवाटोलवी करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न संबंधित अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. पण त्याला हिवरवाडी गावच्या मुलींनी विरोध दर्शवला. त्यावेळी दुरुस्ती व डागडुजीची तयारी केल्याशिवाय येथून हलणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर अधिकाऱ्यांना नमती भूमिका घेत काम करण्याचे आश्वासन द्यावे लागले.
काल हिवरवाडी, भोसे येथील पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या रस्त्यावर नेत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. परंतु निधी अभावी सदरचा रस्ता पूर्ण केला जाऊ शकत नाही किंवा डाकडुजी केली जात नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. नंतर आज सर्व विद्यार्थ्यांनी तहसील परिसरात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही आणणार नाही भूमिका घेतल्यामुळे अधिकाऱ्यांना निर्णय घ्यावा लागला. वरिष्ठांना संपर्क साधून परिस्थितीची माहिती द्यावी लागली. त्यावरून अधिकाऱ्यांनी ही सकारात्मकता दर्शवल्याची दिसून आले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने बांधकाम विभाग व तहसील कार्यालयास पत्र दिले आहे. सदरचा रस्ता सात दिवसात दुरुस्ती न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी सर्व विद्यार्थी कार्यालय परिसरात उपोषण करून शाळा ही तिथेच भरवणार असल्याची माहिती दिली आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात सदरच्या रस्त्यावर मैलकुली पाठवून त्या ठिकाणचे पाणी काढून खड्डे बुजवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. या संदर्भात विद्यार्थ्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही काम करण्याचे आश्वासन दिले आहे.
अनिता पवार ,सरपंच, सुप्रिया पवार, कमल गुळवे, शितल पवार, शिरशा सांगळे, नीलम इरकर, माया सांगळे, संध्या इरकर, शुक्षा पवार, आर पी आय चे रमेश कांबळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे, हनुमंत मांढरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.