उद्या शाळांना सुट्ट्या जाहीर ; तर वाहुन गेलेल्या व्यक्तीची ओळख पटली
समाचार टीम
करमाळा तालुक्यात ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने ओढे नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. त्यामुळे जगजीवन विस्कळीत झाले आहे. तर बऱ्याच शाळांमध्ये पाणी शिरले असून येण्या जाण्याचा रस्ता बंद आहे. त्यामुळे सदरची माहिती सोलापूर येथील अधिकाऱ्यांना मिळताच उद्या करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी एक व्हिडिओ सर्व गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. त्याच्या माध्यमातून उद्याची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपा शहराध्यक्ष जगदिश अगरवाल यांनी तहसिलदार समीर माने व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्याकडे सुट्टी देण्याची मागणी केली होती तर उद्या जिल्हा परिषद सह नगरपरिषद शाळांनाही सुट्टी देण्यात आल्या आहेत अशी माहीती आहे.

तर करमाळा तालुक्यात एक व्यक्ती करमाळा गुळसडी रोडने जाताना वाहून गेला आहे. त्याची ओळख पटली आहे. वाहुण गेलेल्या व्यक्ती चे नाव अशोक रामदास जाधव रा. नाथापुर तालुका व जिल्हा बीड असे आहे. त्या परिसरात तहसीलदार समीर माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, मंडळ अधिकारी संतोष गोसावी आदींसह इतर अधिकारी पोहोचले असून परिसरात पाहणी व बचाव कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तालुक्यात सगळीकडेच पाऊस झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यातच रस्त्यावर आले आहे. त्यामुळे वाहत्या पाण्यात कोणीही प्रवेश करू नये असा सूचना तहसीलदार समीर माने यांनी दिले आहेत.